नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत.

नाशिकचा बुधवारी (ता. 22) कमाल पारा 38.1 अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे, तर गेल्या मंगळवारी (ता. 21) कमाल तापमान 40.1 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे कालच्या तुलनेत दोन अंशांनी तापमानात घट झाली. तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिला. शहरासह राज्यात उष्णतेची लाट होती. त्यातच वातावरणातील गारवा कमी असल्याने उन्हाच्या तडाख्याने जिवाची लाही लाही होत होती. तसेच, किमान पाराही वाढला असून, मंगळवारी रात्री 23.8 तापमान असल्याने प्रचंड उकाडा वाढला. रात्रीच्या उकाड्याने लहान मुले व वृद्धांची घालमेल झाली. आणखी काही दिवस कोरडे हवामान राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
..
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
22 मे : 38.1
21 मे : 40.1
20 मे : 40.3
19 मे : 39.2
18 मे : 38.8

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heat continues in Nashik