जळगावात उष्णतेची लाट कायम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जळगाव - जिल्ह्यातील तापमान कमी न होता वाढत असल्याने उष्णतेची लाट कायम आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे जळगावकर होरपळत आहेत. तापमानात सतत होणाऱ्या वाढीनंतर आज उच्चांकी तापमानाची नोंद झाली. जळगावसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

जळगाव शहर व परिसरात गेल्या दोन आठवड्याभरापासून उष्णतेच्या तिव्र झळा जाणवत आहेत. दुपारी रस्त्यावरून जाताना अक्षरशः गरम हवा लागत असल्याने बाहेर निघणे देखील नकोसे वाटते. आठवडाभरापासून पारा 44 अंशाच्या जवळपास आहे. शहरातील तापमान गेल्या तीन-चार दिवसांपासून 44 अंशावर स्थिरावले असताना, तापमानात आज एक अंशाने वाढ होवून पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहचला. जिल्ह्यातील रावेर, फैजपूर, वरणगाव, अमळनेर या शहरांमध्ये देखील दुपारी तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. 

Web Title: Heatwave continues in jalgaon