
Dhule News : रब्बी हंगामातील हरभऱ्याची मोठी आवक; हरभऱ्याला 'इतका' मिळाला भाव
शहादा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारात गेल्या दोन दिवसापासून रब्बी (Rabi) हंगामातील हरभरा आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. (Heavy arrival of gram in rabi season dhule news)
गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चना, गहू पिकांचे नुकसान झाले असताना आता काढणीला आलेला हरभरा बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून वादळ वाऱ्यासह व विजेच्या कडकडासह गारपीट व पाऊस झाला. यात मंदाणे, म्हसावद, ब्राह्मणपुरी, कुढावद, औरंगपूरसह परिसरात शेकडो एकर जमिनीत असलेल्या गहू, हरभरा तसेच, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
काढणीला आलेला गहू, हरभरा याचे देखील नुकसान झाले आहे. तोंडात आलेल्या घास अचानक गेल्याने अनेक शेतकरी हतबल झालेले आहेत. पावसाचा अंदाज येणार असल्याने काही शेतकऱ्यांनी हरभरा पिक काढून आपल्या घरातच ठेवले होते. गेल्या दोन दिवसापासून ऊन पडल्याने शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रॅक्टर भरून हरभरा विक्रीसाठी येऊ लागलेला आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
दररोज बाजार समितीच्या आवारात सुमारे १०० ते १५० ट्रॅक्टर हरभरा घेऊन मार्केटमध्ये लिलावासाठी येत आहे. पीकेव्हीटू व मेक्सिकन याला चांगलाच भाव मिळू लागलेला आहे. पिकेव्हीटू हा साधारणतः ७ हजार २०० पासून तर सात हजार ५०० रुपये किमतीपर्यंत तर मेक्सिकन सगळ्यात जास्त दहा हजार पेक्षा रुपयाने विकला जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा बाजार समितीच्या आवारात पंधराशे ते दोन हजार रुपये जास्त भाव मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.