बुधवारी नाशकात झालेल्या पावसाचे थैमान..पाहा

paus mahindra satpur.jpg
paus mahindra satpur.jpg

नाशिक : बुधवारी (ता.२५) शहरपरिसर व ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदीपात्रातुन सुरू असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेता अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसून आले. शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार  पावसामुळे नदीपात्रातील पाणीकपातीत वाढ झालेली असून नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याबाबत मनपाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी रस्त्यांवर साचलेले पाणी मोकळे करून देण्याचे काम  युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

औद्योगिक वसाहतीची दैना 

सातपूर : बुधवारी झालेल्या पावसाचमुळे सातपूर व अंबड एमआयडीसीतील वीजपुरवठा खंडित झाला तर अनेक कंपन्य मध्ये पाणी घुसल्याने एकच गोधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे आनेक लघुउद्योगा मध्ये कामगारांना सुट्टी देण्यात आली. दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसाने औद्योगिक वसाहती मधील वीजपुरवठा बंद झाला होता तर सातपूर अंबडसह अनेक कंपन्यामध्ये पाणी घुसल्याने अधिकारी कामगार वर्गाचा एकच गोधळ उडाला. पाणी बाहेर काढण्यासाठी व माल सुरक्षीत स्थळी हलवण्याची कसरत करावी लागली. दुसरीकडे अनेक लघुउद्योगातील कामगारांना लवकर सुट्टी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पाऊसाने औद्योगिक क्षेत्राची दैना उडून दिली होती 

सायखेडात गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ
बुधवारी (ता.२५) सायखेडा नदी काठा शेजारील शेतात शिरले. शिंगवे येथे मारूती मंदिराच्या पाठीमागे पाणी गोदावरी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात पाणी आले असून शिंगवे शिवारात पुराचे पाणी शिरले .मागील महिन्यात आलेल्या महापुराचे पाणी अद्यापही काही शेतात साचलेले असतांना पुन्हा पुराचे पाणी शेतात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. मागील पुराचा अनुभव पाहता सायखेडा येथील गंगानगर भागातील ग्रामस्थ तसेच चाटोरी शिंगवे येथील ग्रामस्थ धास्तावले आहेत.

अस्वली रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईनचा रुळ पाण्याखाली 
बुधवारी (ता.२५) परतीच्या पावसाच्या धुव्वाधार पावसामुळे इगतपुरीत अस्वली रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईनचा रुळ पाण्याखाली गेला. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. गोदावरी एक्सप्रेस घोटी स्थानकावर थांबवली होती.

बुधवारी (ता. २५) रात्री ९ वाजेदरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग
गंगापूर १७३१ क्यूसेक्स 

भावली २९० क्यूसेक्स

कश्यपी २११ क्यूसेक्स 

आळंदी ८६ क्यूसेक्स

दारणा ८९८५  क्यूसेक्स 

पालखेड २८२५ क्यूसेक्स

नांदूरमध्यमेश्वर ६३१० क्यूसेक्स 

होळकर पूल ११२१० क्यूसेक्स 

करंजवन ३६०० क्यूसेक्स

कडवा ३३८५ क्यूसेक्स

ओझरखेड ९३२ क्यूसेक्स

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील धरणे 100% भरले आहे. त्यामुळे  पाण्याचा विसर्ग  गोदावरी ,दारणा व इतर नद्यांच्या नदीपात्रात करण्यात आल्याने, नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी  नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू, पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक  यांच्यामार्फत करण्यात आले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com