अवजड वाहने परवान्याच्या प्रतीक्षेत 

अवजड वाहने परवान्याच्या प्रतीक्षेत 

मालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 15 मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटर अंतराच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणी सक्ती केली आहे. मात्र राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी अवजड वाहनांचे परवाने गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित आहेत. राज्यात सुमारे 20 हजार नवीन वाहन परवाने प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. 

परिवहन मंत्रालयाने अवजड वाहन परवान्यांसाठी प्रशिक्षित चालक असावेत, अपघातांना आळा, इंधनाच्या योग्य वापरासाठी इंधन वापर चाचणी सक्तीची केली आहे.या चाचणीसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण व किमान पाच किलोमीटर अंतराचा ट्रॅक वा रस्ता असावा, पाच किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये प्रत्येकी तीन उजवे- डावे वळण व तीन गतीरोधक असावेत, त्याचवेळी सुयोग्य चाचणी व कार्यक्षम इंधन वापर शक्‍य होईल. ही यशस्वी चाचणी देणाऱ्या उमेदवारासच अवजड वाहन परवाना देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. राज्य परिवहन कार्यालयाने 27 नोव्हेंबरला सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना इंधन वापर चाचणी मोजमापाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणाची माहिती देणारे पत्र पाठविले. 

राज्यात प्रामुख्याने इन्टॅन्गल्स, आदिती व ऑटो कॉप या तीन कंपन्यांकडे हे यंत्र आहे. यंत्राची किंमत दर्जानुसार सुमारे 40 ते 50 हजार रुपये आहे. औरंगाबाद, कोल्हापूर व जळगाव या तीन जिल्ह्यात महिन्यापूर्वी चाचणीकरीता वाहनाला हे यंत्र बसविण्यात आले. हे तीन जिल्हे वगळता अन्य कोठेही अवजड वाहन परवाने सध्या दिले जात नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात 50 प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. काही कार्यालय वगळता हे यंत्र नसल्याने तब्बल 20 हजार परवान्यांचे कामे प्रलंबित असल्याची माहिती विविध कार्यालयांशी संपर्क साधल्यानंतर समजली आहे. 

केंद्रीय व राज्य परिवहनच्या अधिसूचनेनुसार शहराजवळील मालेगाव ते दाभाडी हा पाच किलोमीटर रस्ता सुयोग्य ट्रॅक आहे. त्यावर प्रत्येकी तीन उजवे-डावे वळण व तीन गतीरोधक आहेत. मार्गाची परिवहन अधिकारी व ड्रायव्हींग स्कुल चालकांनी पाहणी केली आहे. शहरातील काही ड्रायव्हींग स्कुल चालक इंधन चाचणी मोजमाप यंत्राबद्दल चौकशी करताहेत. यंत्र येताच अवजड वाहन परवाने मिळू लागतील. 
- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com