PHOTO : लाखमोलाचा "त्यांचा' जीव यामुळे वाचला...

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

म्हसरूळकडून दिंडोरी रोडकडून पंचवटीकडे येणारा रिक्षाचालक विशाल सोनवणे येत होता. त्याने पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर तपासणी मोहीम बघता रिक्षाचालकाने अचानक ब्रेक मारत यूटर्न घेतला. त्याच्या पाठीमागून आलेला दीपक कडाळे या दुचाकीचालकाने ब्रेक लावला. सोबत असलेल्या मित्रासमवेत तो खाली पडला. परंतु त्याने हेल्मेट घातल्यामुळे त्यास इजा झाली नाही.

नाशिक : अनधिकृत रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी सुरू असताना एका रिक्षाचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा दुचाकीचालक व मागे बसलेला त्याचा मित्र हे दोघे खाली पडले. परंतु हेल्मेट घातल्यामुळे त्यांना इजा झाली नाही. पोलिसांनी पाठलाग करून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. 

हेही वाचा > पोलीस असल्याचे सांगून 'ते' भररस्त्यात पैसे मागत होते 

Image may contain: sky and outdoor

अपघाताला कारणीभूत रिक्षाचालक ताब्यात 
बुधवारी (ता. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास पंचवटी पोलिस ठाणे कर्मचारी व वाहतूक शाखा कर्मचारी रिक्षा तपासणी करीत होते. म्हसरूळकडून दिंडोरी रोडकडून पंचवटीकडे येणारा रिक्षाचालक विशाल सोनवणे (वय 20, शांती निवास, सिन्नर फाटा) येत होता. त्याने पंचवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर तपासणी मोहीम बघता रिक्षाचालकाने अचानक ब्रेक मारत यूटर्न घेतला. त्याच्या पाठीमागून आलेला दीपक कडाळे (30, कनाशी, ता. कळवण) या दुचाकीचालकाने ब्रेक लावला. सोबत असलेल्या मित्रासमवेत तो खाली पडला. परंतु त्याने हेल्मेट घातल्यामुळे त्यास इजा झाली नाही. तपासणी मोहीम करत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रिक्षाचालकाने पळ काढला. त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. दुचाकीचालकाने तक्रार दाखल न करता ऑफिसचे काम असल्याचे कारण देत काढता पाय घेतला. यामुळे पंचवटी पोलिसांत याची नोंद नाही

हेही वाचा > स्मार्टसिटी प्रकल्प, बससेवा, टायरबेस मेट्रोचे पुढे काय? 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The helmet saved lives at nashik marathi news