मांजरपाडासह टोपे स्मारकाला चालना देण्यासाठी गडकरींना साकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 सप्टेंबर 2018

येवला : सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करावा तसेच येथील नियोजित तात्या टोपे स्मारक उचित जागी व्हावे व कामाला गती द्यावी अशी मागणी येथील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केली. यावर सकारात्मक आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

येवला : सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करावा तसेच येथील नियोजित तात्या टोपे स्मारक उचित जागी व्हावे व कामाला गती द्यावी अशी मागणी येथील शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केली. यावर सकारात्मक आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

दिल्ली येथील परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, संजय सोमासे, श्रीकांत खंदारे यांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. दिंडोरी, वणी, चांदवड, येवला,निफाड व वैजापूरला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा असला तरी केवळ पूरपाणी आले तरच हे शक्य असल्याने मांजरपाडा केवळ मृगजळ ठरू नये. यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोरेमधील नार पार प्रकल्पातून तालुक्यातील सिंचनासाठी पाणी आरक्षित करावे व उपेक्षित असलेल्या येवलाचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

मांजरपाडा प्रकल्पातील पुरपाण्याचा फायदा तालुक्याला होणार असला तरी विशेष पाणी आरक्षण नसल्याने फारसा फायदा होणार नाही. निसर्गाच्या भरवश्यावर तालुक्यातील सिंचन व्यवस्था आहे.पिण्याच्या पाण्याचे आरक्षण,सिंचनासाठी असणारे पाणी यामध्ये अधिकाऱ्याचे हात ओले कसे होतात. ही वस्तुस्थिती शिष्टमंडळाने ना. गडकरी यांच्यासमोर मांडली. तालुक्याच्या अंतिम सीमेपर्यंत खात्रीचे पाणी द्यावे यासाठी आपण शिष्टाई करावी असा आग्रह गडकरी यांच्याकडे धरला.

सिंचनाची परिस्थिती जाणून घेत ओलिताखाली अधिक क्षेत्र कसे येईल. याबाबत अभ्यास करून हा प्रश्न हाताळला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

दरम्यान, येवल्याचे भूमिपुत्र सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक पालखेड विभागाच्या जागेतच व्हावे अशी आग्रही मागणी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन केली.यावेळी गडकरी यांनी सबंधित विभागाला जागा बदलाच्या सूचना केल्या.

Web Title: With the help of Gadkari in the Manjrapada Tope Memorial