बेवारस मृतदेहांवर मायेचे पांघरूण घालणारा वारस

अमोल कासार
सोमवार, 17 जून 2019

अनेकांनी दिला मदतीचा हात
‘सिव्हिल’मधील विच्छेदनगृहात काम करणारा कर्मचारी आपल्या पैशांमधून बेवारस मृतदेहांना ‘कफन’ घेऊन देत असल्याचे समजताच बेवारस मृतदेहांसाठी पोलिसांसह अनेक दानशूर व्यक्ती मदत करीत असल्याचे अनिल घेंगट यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचाही या कामात हातभार लागत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

जळगाव - सध्याच्या युगात पालकांसह व नातेवाइक बेवारस म्हणून सापडलेल्यांचा ताबा न घेणारे असंवेदनशील लोक आहेत. परंतु, ज्यांना खरोखर कोणी नाही त्या बेवारसांचा वारसदार म्हणून ‘सिव्हिल’मध्ये एक कर्मचारी काम करीत आहे. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात नोकरीस लागल्यापासून त्यांनी आतापर्यंत सुमारे सहाशेपेक्षा अधिक बेवारस मृतदेहांसाठी आपल्या स्वखर्चातून ‘कफन’ घेऊन दिले आहे.

जिल्ह्यात मृतदेह ठेवण्यासाठी केवळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात सुविधा असून, या ठिकाणी १२ रेफ्रिजरेटर असल्याने संपूर्ण जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी सापडलेले मृतदेह या ठिकाणी त्याची ओळख पटविण्यासाठी ठेवले जात असतात. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर किंवा त्याची ओळख न पटल्यास पोलिसांकडून शासकीय पंचांसमक्ष त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्या मृतदेहाचे विच्छेदन केले जाते. विच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या कफनाचा खर्च तपासाधिकाऱ्याला करावा लागतो. परंतु, जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील पी. एम. रूममध्ये काम करणारे अनिल रतनलाल घेंगट  त्या ठिकाणी नोकरीस लागल्यापासून आपल्या स्वखर्चाने बेवारस मृतदेहासाठी कफन आणून सेवा करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helpless bodies Anil Ghengat

टॅग्स