सटाणा पालिकेतर्फे हेमांगी महाजन हिचा सत्कार

रोशन खैरनार
गुरुवार, 7 जून 2018

सटाणा - पितृछत्र हरपल्यानंतर कोणतीही शिकवणी न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे यश मिळवून हेमांगी महाजन हिने इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम राबवून अभ्यासासाठी त्यांना विशेष मदत करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी काल बुधवार (ता.६) रोजी येथे केले.

सटाणा - पितृछत्र हरपल्यानंतर कोणतीही शिकवणी न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे यश मिळवून हेमांगी महाजन हिने इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम राबवून अभ्यासासाठी त्यांना विशेष मदत करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी काल बुधवार (ता.६) रोजी येथे केले.

येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील हेमांगी रमेश महाजन या विद्यार्थिनीने ७८.३० टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशानंतर हेमांगीचा आज सटाणा पालिकेतर्फे नगराध्यक्ष श्री. मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

नगराध्यक्ष श्री. मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
शहरातील कचेरी रोडवरील शिंदेवाडा परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असलेल्या हेमांगी महाजन हिचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर आहे. वडील रमेश महाजन हे एका हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करायचे. गेल्या आठ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी हेमांगीच्या आईवरच आली. हेमांगीला दोन भाऊ असून एक भाऊ सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई म्हणून तर दुसरा भाऊ शहरातील सुयश डेव्हलपर्समध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावतो. तिची आई घरोघरी धुणीभांडीचे काम करते. मात्र घरातील सर्व सदस्य काम करत असताना आपण का मागे राहावे असे म्हणत हेमांगी सुद्धा दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी, शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते.  कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने हेमांगीने कधीही शिकवणी लावली नाही. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलुन ती कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या आई व भावांना आर्थिक मदत देखील करत होती. तिने बारावीच्या परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल पालिकेतर्फे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. 

दरम्यान, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी जयप्रकाश सोनवणे, सटाणा ग्राहक संघाच्या अध्यक्षपदी निलेश पाकळे, भाक्षी ग्रामपंचायत सदस्यपदी सौरभ सोनवणे, भास्कर पाटील व अश्विनी बागुल यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल पालिकेतर्फे नगराध्यक्ष श्री.मोरे यांच्या हस्ते त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष संगिता देवरे, भाजपा गटनेते महेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, मदनलाल हेडे, दत्तू बैताडे, जीवन सोनवणे, परेश देवरे, दिलीप खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Hemangai Mahajan felicitated by Satana Pilliket