नंदुरबारमध्ये थोडक्यात टळली महाडसारखी दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

नंदूरबार : नवापूर तालुक्यात रंगावली नदीमध्ये एसटी बस नदीत वाहून जाण्यापासून थोडक्यात बचावली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील 17 जणांना वाचवण्यात यश आले. यामुळे महाडसारखी दुर्घटना टळली.

आज (गुरुवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  एमएच 20 बीएल 2610 ही एसटी बस वाहून जात होती. मात्र यावेळी बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवले. जेसीबीच्या साहाय्याने बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत असलेल्या अहावा डांगच्या जंगलात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली होती. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Here, in short, like Mahad accident Nandurbar