उच्चशिक्षित दुचाकी चोरटे गजाआड 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

नाशिक - इंजिनिअरिंग, डीएमएलटीचे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही सहज पैसा मिळत असल्याने दुचाक्‍या चोरी करणाऱ्या चौघांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयितांकडून चोरीच्या 15 दुचाक्‍या हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना दुचाकी चोरट्याची खबर मिळाली असता, त्यास सिडकोतील महाराणा प्रताप चौकातून अटक केली. या संदर्भात आकाश अशोक मराठे (रा. सिडको) याने दुचाकीचोरीची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार, संशयित उमेश ऊर्फ पप्पू युवराज मोरे (रा. धुळे) याच्यासह आणखी एका संशयिताच्या मदतीने दुचाकी चोरीत असल्याचे सांगितले. ते संशयित शरद भरत बुवा (रा. शिरपूर), राहुल सुभाष वाघ (रा. शिरपूर) यांच्यामार्फत चोरीच्या दुचाक्‍या विक्री करीत असल्याचे समोर आले. या चौघांनीही पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 15 दुचाक्‍या असा 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित आकाश मराठे व शरद बुवा हे दोघे डीएमएलटी शिक्षण घेतलेले असून, मराठे हा सिडकोतील एका लॅबमध्ये नोकरीही करीत होता. तसेच, उमेश मोरे याने अभियांत्रिकीची शिक्षण घेतले आहे तर राहुल सुभाष वाघ बीएस्सीच्या वर्गात शिकतो आहे. 

Web Title: High-educated criminal arrested in nashik