वंशाचा दिवा म्हणून मुलींच हव्या! 'या' कुटुंबीयांचा मानस..

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

एमबीए झालेले नागेश गाढे नाशिक येथील खासगी उद्योग सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी वेदिका आठ वर्षांची, तर लहान मुलगी ओवी सहा महिन्यांची आहे. आज समाजात मुलगा-मुलगी हा भेद काही अंशी कमी झालेला आहे. त्याला कारणही ठरलीय ती मुलगीच. एक मुलगी म्हणून तिच्या जन्माला येण्याआधीपासूनच जी काही समाजाची नकारात्मक मानसिकता होती ती तिनेच तिच्या सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्वाने बहुतांशी बदलून दाखविली आहे. म्हणूनच मुलगी ही सर्वार्थाने तिला या जगात आणणाऱ्या आई-वडिलांच्या सांभाळापासून तर एका नव्या पिढीच्या सक्षम, सुदृढ, यशस्वी बनविण्यापर्यंत खऱ्या अर्थाने तिचा खूप मोठा वाटा असतो.

नाशिक : "लेक वाचवा, लेक शिकवा'चा जागर शासनाकडून नियमित केलाच जातो. समाजात आता या जनजागृतीमुळे मुलींच्या जन्माचे स्वागतही आता पालकांकडून धडाक्‍यात केले जात आहे. याच जनजागृतीमुळे पुरणगाव (ता. येवला) येथील उच्चशिक्षित तरुण नागेश नरहरी गाढे व अर्चना नागेश गाढे या पती पत्नीने दोन्ही मुलींच्या जन्माचे स्वागत करून कुटुंबासाठी वंशाचा दिवा म्हणून पसंती देत मुलींनाच उच्चशिक्षित करण्याचा मानस व्यक्त केला. 

वंशाचा दिवा म्हणून मुलींना देणार उच्च शिक्षण 

एमबीए झालेले नागेश गाढे नाशिक येथील खासगी उद्योग सेवाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी वेदिका आठ वर्षांची, तर लहान मुलगी ओवी सहा महिन्यांची आहे. आज समाजात मुलगा-मुलगी हा भेद काही अंशी कमी झालेला आहे. त्याला कारणही ठरलीय ती मुलगीच. एक मुलगी म्हणून तिच्या जन्माला येण्याआधीपासूनच जी काही समाजाची नकारात्मक मानसिकता होती ती तिनेच तिच्या सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्वाने बहुतांशी बदलून दाखविली आहे. म्हणूनच मुलगी ही सर्वार्थाने तिला या जगात आणणाऱ्या आई-वडिलांच्या सांभाळापासून तर एका नव्या पिढीच्या सक्षम, सुदृढ, यशस्वी बनविण्यापर्यंत खऱ्या अर्थाने तिचा खूप मोठा वाटा असतो. मुलगी, महिला, आई, आजी ही आता अबला राहिलेली नसून ती सर्व आघाड्यांवर एक सबला बनून राहिली आहे असल्याचे श्री. गाढे यांनी सांगत दुसरीही मुलगीच असू दे! मुलगीच हवी म्हणून श्रद्धेपोटी आयुष्यात पहिल्यांदाच वणीच्या सप्तशृंगीदेवीला नवस बोलला आणि तो पूर्णही झाला. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing

पुरणगाव : गाढे दांपत्य आपल्या दोन्ही मुली वेदिका व ओवीसमवेत

मुलींच्या प्रती समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलतोय...

मुलींच्या प्रती समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा दृष्टिकोन बदलतोय याचा मनस्वी आनंद होतोय! वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचे स्वागत जसे पेढे वाटून करतात, तसेच स्वागत मुलीच्या जन्माचे झाले, तर मुला-मुलींमधील भेद दूर होण्यास मदत होईल व कोणत्याही घरात नकोशी हे दूषण लावून मुलगी जन्माला येणार नाही, असेही आवर्जून सांगितले. आम्ही पती-पत्नीने मिष्टान्नवाटप करून दुसऱ्याही मुलीच्या जन्माचे स्वागत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher education will be given to girls at yeola Nashik