तुरुंगवास भोगून परतलेल्या आंदोलकांचे जोरदार स्वागत

Highly welcomed protesters
Highly welcomed protesters

इंदिरानगर : स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणासमोरही लाचार नसल्याने संघटनेने केलेले प्रत्येक आंदोलन यशस्वी होते. असे मत  संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले. 16 जुलै ला राज्यभर पेटलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात अटक झालेल्या आणि नवी मुंबई येथील तळोदा कारागृहात गेले. 19 दिवस बंद असलेल्या 7 कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर संघटनेतर्फे पाथर्डी फाटा येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

तुरुंगातून सुटून आलेले हंसराज वडघुले, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील(सर्व नाशिक), दीपक पगार (उत्राने), सोमनाथ बोराडे (कोकणगाव), युवराज देवरे (सटाणा) आणि संजय जाधव (मालेगाव) या सर्वांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पगार, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, छावा संघटनेचे करण गायकर, मराठा सोशल फाउंडेशनचे नगरसेवक दिलीप दातीर सोमनाथ बोराडे, कॉम्रेड राजू देसले आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत. 

सावंत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार कोणताही निर्णय घेत नसल्याने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला यश मिळाले आहे. त्यात या सात शिल्पकारांचा मोठा सहभाग आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठा आंदोलनाच्या पाठीमागे देखील भक्कमपने उभी आहे.

आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले शासकीय कामात अडथळा हे 353 कलम रद्द करण्याची मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, सुधाकर मोगल रामचंद्र निकम,विजय पगारे, चंद्रभान पगारे विक्रम गायधनी, निवृत्ती पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com