चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध करून आश्‍चर्याचा धक्का दिला. दोन्ही विभागातील भोंगळ कारभार यातून समोर आला असून समांतर रस्तेकामाबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांच्या मागणीने जोर धरला असून त्यासंदर्भात अनेक आंदोलनेही झाली आहेत. नुकतेच बारा दिवस चाललेल्या साखळी उपोषणानंतर हे काम मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

निविदेचा घोळ 
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कालिंका माता चौक ते आहुजानगरपर्यंतच्या सात किलोमीटरच्या टप्प्याचे चौपदरीकरण व समांतर रस्ते करण्यात येणार असून त्यातील चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याची निविदा आता प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 कोटी 40 लाख खर्चाची महामार्ग मजबुतीकरणाची निविदा प्रसिद्ध केल्याने गोंधळ उडाला. 

हे काम होते अपेक्षित 
बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेल्या या निविदेनुसार गिरणा पूल ते गौरव हॉटेलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला दीड मीटर साईडपट्ट्यांचे डांबरीकरण करण्यात येणार होते. तसेच या सात किलोमीटरच्या टप्प्यात वाहतूक वर्दळीच्या सहा-सात क्रॉसिंगवरील दोन्ही बाजूंकडील मार्गांचे पॅचवर्कही करण्यात येणार होते. 

कृती समितीची भूमिका 
महामार्ग विस्तार हा शहर हद्दीत गिरणापूल ते हॉटेल गौरव या टप्प्यात होईल. हे चौपदरीकरण झाले तरी गिरणापूल ते पाळधी बायपास फाट्यापर्यंत व हॉटेल गौरव ते तरसोद बायपासपर्यंत महामार्ग अरुंदच राहील. ही बाब लक्षात घेता बांधकाम विभागाने महामार्ग विस्तार हे काम व खर्च कायम ठेवून केवळ जागा बदलावी. 

शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्तेकामास मान्यता मिळाली आहे. यात पहिल्या टप्प्यात महामार्ग चौपदरीकरणाची 70 कोटी रुपये खर्चाची निविदा शुक्रवारी (ता. 14) प्रसिद्ध करण्यात येईल. 
- सी. एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, न्हाई 
 
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाने शहरातून जाणाऱ्या महामार्ग मजबुतीकरणासाठी 12 कोटी 40 लाखांची निविदा प्रसिद्ध केली. "न्हाई'ने हे काम रद्द करण्याबाबत लेखी पत्र दिल्यास निविदा रद्द करू. 
- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी परस्परांत समन्वय ठेवून पावले उचलावी. काम तातडीने कसे सुरू होईल, याबाबत दोन्ही विभागांनी समन्वयातून पाठपुरावा करावा. 
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री 

Web Title: highway four lane Repairs tender