रस्ता दुरुस्तीची उभी केली मोठी यंत्रणा..पण बुजवले अवघे दोनच खड्डे ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सिन्नर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता समजला जातो. अकोले, इगतपुरी तालुक्‍यांतील अनेक गावांना याच मार्गाने वाहतूक सुरू आहे. ठाणगावमार्गे कसारा, इगतपुरी, अकोले तालुक्‍यातील खिरविरे, समशेरपूर, संगमनेर अशा अनेक बसगाड्या सिन्नर आगारातून याच मार्गे धावतात. शेतीमालाच्या वाहतुकीची या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. परराज्यातील अनेक टोमॅटो व्यापाऱ्यांची मोठी वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाल्याने या ठिकाणी पायी चालणेही कठीण बनले आहे.

नाशिक :  सिन्नर- ठाणगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने बेलांबा परिसरातील केवळ दोनच खड्डे बुजवून वाहनचालकांना निराश केले आहे. जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. रस्त्याची अवस्था बिकट असल्याने या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही वाढलेले होते. डुबेरे, ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडी, डुबेरेवाडी, आटकवडे आदी गावांतील ग्रामस्थांनी अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने बेलांबा परिसरात रस्ता दुरुस्तीची मोठी यंत्रणा उभी करून केवळ दोनच खड्डे बुजविल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

बेलांबा : फक्त दोनच खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठ्या यंत्रसामग्रीसह आलेला लवाजमा. 

रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अपघातांत वाढ 

सिन्नर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता समजला जातो. अकोले, इगतपुरी तालुक्‍यांतील अनेक गावांना याच मार्गाने वाहतूक सुरू आहे. ठाणगावमार्गे कसारा, इगतपुरी, अकोले तालुक्‍यातील खिरविरे, समशेरपूर, संगमनेर अशा अनेक बसगाड्या सिन्नर आगारातून याच मार्गे धावतात. शेतीमालाच्या वाहतुकीची या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. परराज्यातील अनेक टोमॅटो व्यापाऱ्यांची मोठी वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाल्याने या ठिकाणी पायी चालणेही कठीण बनले आहे. बेलांबा, डुबेरेवाडी, अण्णाचा मळा, हिवरे फाटा, टेंभूरवाडी, ठाणगावच्या पेट्रोलपंपासमोरील रस्ता पावसामुळे वाहून गेलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बेदखल केल्या जात असल्याने वाहनचालक हतबल झाले आहेत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highway potholes create problem citizens Nashik Marathi News