हवी होती सोन्याची पोत..पण मागितले काय..आणि घडले काय....

CHAIN SNACTHING.jpg
CHAIN SNACTHING.jpg

नाशिक : त्यांनी कांदारोप आहे का, अशी विचारणा केली अन्‌ बेसावध असलेल्या जगताप यांच्याजवळ बोलत-बोलत जाऊन शेजारी पडलेला दगड उचलून डोक्‍यात मारला. आणि त्यानंतर जे काही झाले ते थक्क करणारे होते.

असा घडला प्रकार..
कांद्याचे रोप आहे का, याची विचारणा करत धामणगाव येथे भरदुपारी घरासमोर शेतात कांदा काढणाऱ्या चंद्रकला बबन जगताप यांना दोन चोरट्यांनी डोक्‍यात दगड मारत त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. धामणगाव येथे जगताप दुपारी तीनच्या सुमारास आपल्या शेतात कांदा काढताना दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी कांदारोप आहे का, अशी विचारणा केली अन्‌ बेसावध असलेल्या जगताप यांच्याजवळ बोलत-बोलत जाऊन शेजारी पडलेला दगड उचलून डोक्‍यात मारला. अचानक हल्ला झाल्याने त्या घाबरल्या असता त्याचा फायदा घेत चोरट्यांनी गळ्यातली तीन तोळ्यांची पोत ओरबाडली आणि धूम ठोकली. चंद्रकला यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील लोक मदतीला धावून आले. पुतण्या किशोर जगताप आणि अशोक भागवत यांनी तत्काळ चंद्रकला यांना येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. भरदिवसा हा प्रकार झाल्याने धामणगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुलगा सचिन जगताप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com