‘होमिओपॅथी’ने आंतरिक मनाचीही होते सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जळगाव - सेवा ही एक कला, साहित्य आहे. त्याचप्रमाणे सेवा म्हणजे जीवन आहे. त्यातल्या त्यात होमिओपॅथी हे एक वेगळे शास्त्र असून, हे केवळ शारीरिक औषधच नाही तर मानसिक आणि आंतरिक मनाची सुधारणा कशी होईल, यावरील उपचार असल्याचे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आज येथे व्यक्‍त केले.

जिल्हा होमिओपॅथीच्यावतीने आज (९ एप्रिल) होमिओपॅथी दिनानिमित्त दोन डॉक्‍टरांना होमिओपॅथी जीवन सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. गुजराथी बोलत होते. याप्रसंगी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. शेखर प्रभुदेसाई उपस्थित होते. सुरवातीला दीपप्रज्वलन होऊन होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गेल्या ९५ वर्षांपासून होमिओपॅथीची सेवा करणारे डॉ. चंद्रकांत चौधरी व पंचवीस वर्षांपासून सेवा देणारे डॉ. विलास महाजन यांना होमिओपॅथी जीवन सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. गुजराथी म्हणाले, की डॉक्‍टर आपल्यासोबत आहेत. पण आपले स्वास्थ आपण स्वतःच सांभाळायला हवे. शरीर, मन आणि हृदय यांचा आत्मिक संबंध असतो. पण नकारात्मक विचार करून जगणारा माणूस कधीच सुधारत नाही. अन्न हे औषध आहे असे समजून घ्यावे. पण औषधाला आपले अन्न बनवू नका, असा सल्ला देखील त्यांनी दिला. यावेळी पुरस्कारार्थी डॉ. चंद्रकांत चौधरी व डॉ. विलास महाजन यांनी देखील मनोगत व्यक्‍त केले. डॉ. रवी हिराणी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: homoeopathy medicine arunbhai gujrathi jeevanseva award