प्रामाणिक पोलिस व होमगार्ड! ७१ हजार रुपये ठेवलेली पर्स केली परत   

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

लॅम रोडवरील सौभाग्यनगर येथे रस्त्याच्या कडेला त्यांना एक बेवारस पर्स आढळली. संजय शिंदे यांनी पर्सची तपासणी केली असता, त्यामध्ये ७१ हजार रुपये आणि डेबिट-क्रेडिट कार्ड, वाहनाचे कागदपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्समधील कागदपत्रावर अंजना सुदाम जाधव यांचे नाव व मोबाईल क्रमांक होता. त्यावर हवालदार शिंदे यांनी संपर्क साधून त्यांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात बोलविले. त्यांच्याकडून पर्सची व ऐवजाची ओळख पटवून घेतल्यानंतरच त्यांची पर्स, त्यातील ७१ हजार रुपये आणि कागदपत्रे अंजना जाधव यांना परत केले.

नाशिक : लॅम रोडवर रस्त्याच्या कडेला ७१ हजार रुपयांची रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स नाशिक रोडचे पोलिस हवालदार आणि होमगार्ड जवानाने महिलेस परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस उपायुक्त विजय खरात, नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

नेमके काय झाले...

गुरुवारी (ता.७) सकाळी साडेसातच्या सुमारास नाशिक रोडचे बीट मार्शल पोलिस हवालदार संजय शिंदे, होमगार्डचे जवान मोहन शिंदे हे दोघे हद्दी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान लॅम रोडवरील सौभाग्यनगर येथे रस्त्याच्या कडेला त्यांना एक बेवारस पर्स आढळली. संजय शिंदे यांनी पर्सची तपासणी केली असता, त्यामध्ये ७१ हजार रुपये आणि डेबिट-क्रेडिट कार्ड, वाहनाचे कागदपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. पर्समधील कागदपत्रावर अंजना सुदाम जाधव यांचे नाव व मोबाईल क्रमांक होता. त्यावर हवालदार शिंदे यांनी संपर्क साधून त्यांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात बोलविले. त्यांच्याकडून पर्सची व ऐवजाची ओळख पटवून घेतल्यानंतरच त्यांची पर्स, त्यातील ७१ हजार रुपये आणि कागदपत्रे अंजना जाधव यांना परत केले. अंजना जाधव यांच्यासाठी एकदम सुखद धक्काच होता. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संजय शिंदे, मोहन शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले. 

Image may contain: one or more people and people standing

स्वत:शी प्रामाणिक राहायला शिका...
प्रामाणिकपणा हा असा गुण आहे. तो नसेल तर सारे काही निरर्थक आहे. काम करताना त्या कामाप्रती आपण आपली संपूर्ण निष्ठा बहाल करायची असते. जर तुमच्याप्रती प्रामाणिक असाल तरच तुमच्या कामाप्रतीही तुम्ही प्रामाणिक राहता.प्रामाणिकपणा राहिला तरच त्याचा व्यक्तीला आणि समाजालाही काही उपयोग होईल. निष्क्रिय प्रामाणिकपणा हा स्वत:साठीही घातक ठरतो आणि समाजासाठीही. त्यामुळे समाजालाच नव्हे तर आपल्या स्वत:लाही आज सक्रिय प्रामाणिकतेची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honest police and homeguards Returned 71 thousand with Purse Nashik News