Nandurbar : शिक्षकाचा प्रामाणिकपणा; टॅक्सी ड्रायवरचे सापडलेले पाकिट केले परत

teacher returned purse to taxi driver
teacher returned purse to taxi driveresakal

नंदुरबार : येथील शिक्षकाच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी (Humanity) आणि प्रामाणिकपणा (Honesty) शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे. या शिक्षकाने सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे परत केले आहे. (honesty of taxi driver Returned the lost wallet Nandurbar News)

teacher returned purse to taxi driver
Nashik : जिल्ह्याच्या पत आराखड्यात 672 कोटींचा वाढ

सुनील साठे असे या शिक्षकाचे नाव आहे. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालय भालेर येथील कार्यरत शिक्षक श्री. साठे घरगुती कामानिमित्त नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांना पैसे, सिम कार्ड, एटीएम कार्ड, इतर महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट सापडले. त्यांनी पाकिट उघडले असता एका टॅक्सी चालकाचे असल्याचे समजले. श्री. साठे यांनी तत्काळ नंदुरबार येथील बस स्थानकासमोरील टॅक्सी स्टॅंड गाठून उपस्थित टॅक्सी चालकांशी चर्चा केली. संबंधित टॅक्सी चालक यांच्याशी संपर्क साधत त्यांना पाकिट परत करून प्रामाणिकतेचे दर्शन घडविले.

teacher returned purse to taxi driver
नाशिक : खरीप हंगामासाठी 17 हजार हेक्टरवर पेरणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com