'इथल्या' बैलबाजारात गुंड मागतात खंडणी...अखेर व्यापाऱ्यांनी उचलले 'हे' पाऊल

bulluck market.JPG
bulluck market.JPG

नाशिक : घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. 16) भरलेल्या बैलबाजारात काही गुंडांनी जनावरे खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना पैशांसाठी धमकावले. त्यामुळे व्यापारीवर्गाने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या जनावरांची खरेदी करणे बंद केले. गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केली. 

गुंडांची धक्काबुक्की...व्यापारीवर्गात दहशत
घोटी बाजार समितीत तालुक्‍यासह अकोले, सिन्नर, जव्हार, वाडा तालुक्‍यांतून शेतकरी मोठ्या संख्येने आपली जनावरे विक्रीसाठी आणतात. ही जनावरे खरेदी करण्यासाठी औरंगाबाद, ठाणे, नगरचे व्यापारी गर्दी करतात. या व्यापाऱ्यांना काही समाजकंटक गेल्या काही दिवसांपासून पैशांसाठी धमकावतात. शनिवारी सकाळी गुंडांनी काही व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागितली. व्यापारीवर्गाने विरोध केला असता, त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडल्याने व्यापारीवर्गात दहशत पसरली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शनिवारी जनावरे खरेदीवर बहिष्कार टाकून बाजार समितीकडे तक्रार केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांची विक्री झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून हा उपद्रव सुरूच असून, त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच संचालक ऍड. संदीप गुळवे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, संचालक शरद हांडे यांनी बाजार समितीत येऊन व्यापारीवर्गाची भेट घेतली व व्यवहार सुरू ठेवण्याची विनंती केली. अज्ञात समाजकंटकांविरोधात घोटी पोलिस ठाण्यात तक्रार केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक जालिंदर पळे व कर्मचाऱ्यांनी बाजार समितीत येऊन घटनेची माहिती घेतली. 
 
पोलिसांनी या गोष्टीला वेळीच आवर घालावा 
गुंड कोणालाही न जुमानता बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना उघडपणे खंडणीसाठी धमकावतात. या प्रकाराला बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यवस्थापन, शेतकरी सर्वच वैतागले आहेत. पोलिसांनी या गोष्टीला वेळीच आवर घालावा. शेतकरी, व्यापारीवर्गाने घाबरून जाऊ नये. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - ऍड. संदीप गुळवे, संचालक, घोटी बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com