'हिऱ्या'ला मिळाली हिऱ्याची किंमत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सारंगखेडा - देशभरात अश्‍व बाजारासाठी पहिल्या क्रमांकाची असलेल्या व विविध वैशिष्ट्‌ये जपलेल्या येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेंतर्गत सोमवारी तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आज येथील घोडे बाजारात विक्रम प्रस्थापित झाला. सर्वाधिक किमतीचा "हिरा'नावाचा घोडा पाच लाख 71 हजार रुपयांना विकला गेला. तो आता बारामतीचा झाला आहे.

रत्नागिरी येथील प्रथमेश शिरीष पवार यांनी काल दोन घोडे खरेदी केले. "राजा'ला पाच लाख 51 हजार, तर "बादशाह'ला पाच लाख 11 हजारे किंमत मिळाली. "हिरा'नामक काळा कुमैद मारवाड जातीचा घोडा पाच लाख 71 हजार रुपयांत बारामती येथील पृथ्वीराज घोलप यांनी खरेदी केला. दुसाने (ता. साक्री) येथील रोहित भदाने यांनी तो विकला.

दिवसभरात 104 घोड्यांच्या विक्रीतून 50 लाखांची उलाढाल झाली. आतापर्यंत 530 घोड्यांच्या विक्रीतून एक कोटी 56 लाखांची उलाढाल झाली आहे. देशाच्या विविध भागांतून यात्रेत घोडे खरेदी व विक्रीसाठी दाखल झालेले आहेत.

Web Title: Horse Bazar Hira Horse

टॅग्स