अबब... कोटीचा घोडा

रमेश पाटील
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सारंगखेडा, (ता. शहादा) - त्याला दररोज पाच लिटर दूध... खुराक म्हणून काजू, बदाम, अंडे व इतर बरेच काही... दिमतीला चार सेवक... हे वर्णन तालमीतल्या कुण्या पहिलवानाचे नाही, तर सारंगखेडा अश्व बाजारात आलेल्या "सुलतान' नावाच्या घोड्याचे आहे आणि त्याची किंमत आहे तब्बल एक कोटी 11 लाख रुपये..!

येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व बाजारातील खरेदी विक्री सुरू झाली असून, देशातील विविध भागांतून दोन हजार घोड्यांसह विक्रेते दाखल झाले आहेत. या बाजारात रविवारी दाखल झाला तो म्हणजे सुलतान नावाचा देखणा अश्व. रुबाबदार, पांढराशुभ्र, दोन हजार अश्वांमध्ये सर्वांत उंच असा त्याचा रुबाब. हा अश्व नुकरा जातीचा असून, मगोरोला (उज्जैन) येथील मानसिंग राजपूत यांचा हा अश्व आहे. राजपूत हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. "सुलतान'चे वय साडेचार वर्षे व उंची 65 इंच आहे. त्याचे डोळे भुरसट असून, पांढराशुभ्र वर्ण आहे. "सुलतान'चा रोजचा खर्च पाच हजार रुपये असून, त्याला पाहण्यासाठी अश्व बाजारात गर्दी वाढली आहे.

Web Title: Horse Marker Sarangkheda

टॅग्स