हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयांत प्रवेशासाठी सीईटी देणे बंधनकारक आहे. चार वर्षांच्या पदवी व दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येतील.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत अन्य विविध अभ्यासक्रमांप्रमाणे हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची "सीईटी' आयोजित केली आहे. या शाखेत पदवी व पदव्युत्तर पदवी असे दोन पद्धतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (एम. एचएमसीटी) हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे.

Web Title: hotel management syllabus online form process