ग्रामीण भागात लोणचे बनविण्यासाठी गृहिणीची लगबग

Housewife to make pickles in rural areas
Housewife to make pickles in rural areas

खामखेडा (नाशिक ) : येथील ग्रामीण भागात कैरीचे लोणचे बनविण्यासाठी गृहिणीची लगबग सुरु झाली आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर हमखास वर्षभर टिकेल अश्या पद्धतीने लोणचे तयार करण्याची रीत असून, घरोघरी लोणच्याचा खाराचा घमघामट सुटू लागला आहे. परंतु, यंदा आब्यांचा बहारच कमी असल्याने व लोणच्यासाठी लागणारी कैरीची आवक बाजारात होत नसल्याने यावर्षी चवदार असे लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहे.

महाराष्ट्रीयन पद्धतीच्या मराठमोळ्या जेवनाच्या ताटात आंबट-गोड-तिखट असे चवदार लोणचे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. व जेवणाचे ताटही लोणच्याशिवाय अपूर्ण दिसते. जेवणाच्या ताटात तोंडी लावायला लोणचे नसेल तर त्या जेवणाची रंगत ती काय? त्यानुसारच पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे घरोघरी बनवले जाते.

यावर्षी आंब्याच्या बहार उशिरा व फळ गळतीमुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यात मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात कैरी गळून पडली आहे. यामुळे लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक अजूनही बाजारात मंदावलेली आहे. त्यामुळे बाजारात असलेल्या कैरीचा भावही वधारला आहे. कैरीची आवक कमी झाल्याने चढ्या दरात कैरी विक्री होत आहे. लोणच्याच्या कैरीचे भाव शेकडा तीनशे ते चारशे रुपये एवढे असून मागील वर्षी हेच भाव दीडशे ते दोनशे रुपये शेकडा होता. दर जास्त असूनही मुबलक प्रमणात व दर्जेदार कैरी मिळतेच आहे असे नाही.


लोणचे तयार करण्यासाठी लागणारा गरम मसालाही तेजीत असल्याने लोणचे तयार करताना खिसा गरम होतो आहे. लागणारे शेंगदाणातेल, गरम मसाले, मोहरी, हिंग, लवंग, हळद, बडीशोप, धने, दालचिनी, वेलची, मोहरी डाळ यांची जुळवाजुळव गृहिणीकडून होतांना दिसत आहे. 

शंभर कैरीचे लोणचे बनविण्यासाठी साधारण आठशे रुपयेचा मसाला, सहाशे रुपयाचे शेगदाना तेल व दोनशे रुपयाचे मिरचीचे तिखट असे ऐकून सोळाशे रुपये खर्च येतो त्यातही कमी अधिक दर्जाचा माल घेतल्यास भावात फरक पडतो.मान्सून पूर्व पाऊस  झाल्याने लोणच्याचा मसाला घेण्यास गृहिणी गर्दी करू लागल्या आहेत. 

अनिल शिरोरे, कुलस्वामिनी किराणा खामखेडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com