इगतपुरी स्टेशनजवळ हावडा मेल एक्सप्रेसचे तीन डबे घसरले

पोपट गवांदे
रविवार, 10 जून 2018

मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन डबेच रेल्वे रूळावरून घसरल्याने मध्यरेल्वेची चार तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातामुळे मनमाडहुन मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.

इगतपुरी : इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या हावडा मेल एक्सप्रेसचे तीन डबे रेल्वे रूळावरून घसरल्याने चार तास वाहतुक ठप्प झाली.

मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन डबेच रेल्वे रूळावरून घसरल्याने मध्यरेल्वेची चार तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातामुळे मनमाडहुन मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.

याबाबात सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या मेलचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळील तीन लकडी पुलाजवळ घसरल्याने दोनही बाजुची वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातात प्रवशांना कीरकोळ मार लागला असुन मोठी जिवीत हाणी टळली. अपघाताची माहीती समजताच रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर घसरलेले डब्बे काढण्याचे काम सुरु केले. हावडा मेलेचे उर्वरीत डबे कसारामार्ग मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वे स्थानकात आणुन प्रवाशांची सुटका करुन इतर गाडीने मार्गस्थ करण्यात आले. या अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. अपघातामुळे मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. तर लांब पल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे.

दरम्यान या गाडीच्या १८ बोग्यानाशिक येथे थांबविण्यात आले आहे,अर्धे डबे ईगतपुरी येथे आहे ते घेऊन सर्व बोग्या एकत्र करुण मग गाडी पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुत्राकडून देण्यात आली आहे.

Web Title: Howda express 3 bogies derailed near igatpuri