बारावीची मंगळवारपासून लेखी परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नाशिक - येत्या 28 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरवात होत आहे. नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांमधून एक लाख 68 हजार 287 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक 74 हजार 719 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. 

इयत्ता बारावी हा करिअरचा महत्त्वाचा टप्पा समजला जातो. कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखांतून विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. येत्या 28 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरवात होत आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागांतर्गत मराठी, इंग्रजी, ऊर्दू माध्यमांचे मिळून एक लाख 68 हजार 287 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 218 केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल. जिल्ह्यात 86 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 

धुळे जिल्ह्यातून 25 हजार 474, जळगावमधून 51 हजार 709, नंदुरबार जिल्ह्यातून 16 हजार 355 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. निवडणूक संपताच बारावीच्या लेखी परीक्षेला प्रारंभ होईल. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पाडून पारदर्शी निकाल लावण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. 

"प्रवेशपत्रामधील चुकांनी घाबरू नये' 
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना काही राहिलेल्या त्रुटींमुळे प्रवेशपत्रात काही चुका होण्याची शक्‍यता आहे. मात्र, या चुकांबद्दल विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता, आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांशी संपर्क साधावा. व त्यांच्याकडून दुरुस्ती करून घ्यावी. दुरुस्त केलेल्या प्रवेशपत्रांच्या सत्यप्रती संबंधित महाविद्यालयांच्या परीक्षा विभागाने मंडळाला पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही, असे सांगण्यात आले आहे. 

Web Title: HSC from the written test Tuesday