मालेगावच्या महिलेची "सौदी'त विक्री 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मालेगाव - येथील हुडको कॉलनीत राहणाऱ्या मिस्कीसबानो शेख इक्‍बाल (वय 48) या महिलेला हज यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला पाठवून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिला गुलाम म्हणून डांबून ठेवण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित वसीम शेख मेहबूब चारेवाला यास पोलिसांनी अटक केली आहे. 

येथील राजानगर भागातील वसीम याने मिस्कीसबानोला हज यात्रा व किरकोळ कामासाठी सौदी अरेबियाला पाठविण्याचे आमीष दाखविले. हज यात्रेमुळे मिस्कीसबानोने जाण्यास तयारी दर्शविली. वसीम शेख याने फईम शेख मेहमूद (रा. राजानगर, मालेगाव) व अय्यूबखान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या मदतीने तिला भारतातून सौदी अरेबियातील व्यापारी अब्दुल मजीद शेठ (रा. सियाल, सौदी अरेबिया) यांच्याकडे पाठविले. तिघांनी तिची कामगार म्हणून दोन लाख 80 हजार रुपयांना विक्री केली. अब्दुल मजीदने तिला गुलामाची वागणूक देत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार एक जुलै ते 13 नोव्हेंबर 2016 या कालावधीत झाला. 

मिस्कीसबानो सौदी अरेबियाला गेल्यानंतर तिच्या मुलाचा तिच्याशी संपर्क होत नव्हता. वसीम शेखकडे विचारणा करुनही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे महिन्यापूर्वी मिस्कीसबानोच्या मुलाने आझादनगर पोलिसात तक्रार केली होती. उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर राजमाने यांनी वसीमची कसून चौकशी केली. दरम्यान, वसीमने सौदी अरेबियाला संपर्क साधल्याने मिस्कीसबानो येथे परतली. मिस्कीसबानोचा जबाब पोलिसांनी नोंदविल्यानंतर पोलिसांनी वसीमला अटक करून चौघांविरुद्ध पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवला आहे. 

Web Title: Human smuggling case