VIDEO : खाकी वर्दीतली माणुसकी! मांज्यात अडकलेल्या पक्षीला वाचविले..

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

अंबड पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कार्यालया समोरील झाडाच्या फांदीवर एक कबुतर मांज्यात अडकल्याचे हवालदार विजय जगताप यांच्या दृष्टीपथास पडले. त्यांनी पोलिस हवालदार काशीद यांच्या मदतीने अडकलेल्या कबुतरची अवघ्या दहा मिनिटात सुटका केली. यावेळी पोलिस व उपस्थित तक्रारदारांनी गर्दी केली हीती. पोलिसांच्या या पक्षीप्रेमाबद्दल आज संपूर्ण सिडको परिसरात नागरिकांत एकच चर्चा ऐकायला मिळत होती.

नाशिक : पोलिसांकडे सामान्य माणसाचा बघण्याचा कल नेहमीच वेगळा असतो. मात्र पोलीसांतही माणुसकी व पक्षीप्रेम असते हे दाखवून देणारे उदाहरण सोमवारी (ता.५) बघायला मिळाले. जिथे इतरवेळी ज्या वर्दीचा धाक वाटतो. त्याच वर्दीतल्या माणसाने अंबड पोलिस ठाणे हद्दीतील झाडावर अडकलेल्या कबुतराची सुटका करताना माणुसकीचे दर्शन घडवले.

Image may contain: 2 people, people smiling, people standing, tree and outdoor

त्याचे झाले असे की, सोमवारी सकाळी अंबड पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कार्यालया समोरील झाडाच्या फांदीवर एक कबुतर मांज्यात अडकल्याचे हवालदार विजय जगताप यांच्या दृष्टीपथास पडले. त्यांनी पोलिस हवालदार काशीद यांच्या मदतीने अडकलेल्या कबुतरची अवघ्या दहा मिनिटात सुटका केली. यावेळी पोलिस व उपस्थित तक्रारदारांनी गर्दी केली हीती. पोलिसांच्या या पक्षीप्रेमाबद्दल संपूर्ण सिडको परिसरात नागरिकांत एकच चर्चा ऐकायला मिळत होती.
 

सिडको :  झाडावर अडकलेल्या कबुतराची सुटका करतांना पोलिस हवालदार विजय जगताप व काशीद

 या धावपळीच्या आयुष्यात लोकांना एकमेकांसाठी वेळच नसतो. अनेकदा या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण माणुसकी हरवल्याची तक्रार करत असतो. पण काही वेळा अशा काही घटना समोर येतात. ज्यामुळे माणुसकी अद्यापही जिवंत आहे यावर विश्वास बसतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity shows of Police Saved bird in Nashik

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: