बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाचे बेमुदत उपोषण मागे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

सटाणा : दररोजच्या मोठ्या अवजड वाहतुकीमुळे सटाणा शहरातून जाणारा विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शहराबाहेरील वळण रस्त्याचे प्रलंबित काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरातील महामार्गावर सर्व अवजड वाहनांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी करावी. तसेच मालेगाव - सटाणा या राज्यमार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता टेहरे फाट्याजवळ अवजड वाहनांना प्रतिबंध करावा. या मागण्यांसाठी काल (ता.1) महाराष्ट्र दिनी बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

सटाणा : दररोजच्या मोठ्या अवजड वाहतुकीमुळे सटाणा शहरातून जाणारा विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. शहराबाहेरील वळण रस्त्याचे प्रलंबित काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरातील महामार्गावर सर्व अवजड वाहनांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी करावी. तसेच मालेगाव - सटाणा या राज्यमार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता टेहरे फाट्याजवळ अवजड वाहनांना प्रतिबंध करावा. या मागण्यांसाठी काल (ता.1) महाराष्ट्र दिनी बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी येत्या (ता.27) मे ला विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर प्रश्न मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दूरध्वनीवरून उपोषणकर्त्या पत्रकारांना दिल्याने बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. मात्र प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या 5 जून पासून सर्व पक्ष संघटनांसह पत्रकार संघ पुन्हा तीव्र आंदोलन छेडेल, असा संतप्त इशारा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी दिला आहे.

बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाने या मागणीचे निवेदन गेल्या आठ दिवसांपूर्वीच तहसीलदार, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले होते. मात्र प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेण्यात न आल्याने अखेर दिलेल्या इशाऱ्यानुसार आंदोलन छेडण्यात आले.

काल (ता. 1) सकाळी अकरा वाजता पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे व खजिनदार अंबादास देवरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कैलास येवला, जिल्हा पदाधिकारी काशिनाथ हांडे, उपाध्यक्ष रमेश देसले, सरचिटणीस रोशन खैरनार, कार्याध्यक्ष सतीश कापडणीस, नंदकिशोर शेवाळे, देवेंद्र वाघ, अरुणकुमार भामरे, संजय खैरनार, महेश भामरे, शशिकांत बिरारी, परिमल चंद्रात्रे, राकेश येवला, प्रफुल्ल कुवर, सुनील खैरनार, अशोक गायकवाड, साहेबराव काकुळते, रणधीर भामरे, रमेश बोरसे, गोरख बच्छाव आदींसह पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष चंद्रात्रे म्हणाले, विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून अपघातांची मालिका सुरु आहे. गेल्या काही वर्षात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सटाणा शहराला पूर्व व पश्चिम बाजूकडून वळण रस्ता व्हावा, यासाठी अनेकवेळा विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने आंदोलनेही केलेली आहेत. मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.

महामार्गाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र अजूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत वळण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स, बारा चाकी, 16 चाकी व इतर सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी. तर मालेगाव - सटाणा या राज्यमार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी सोयगावजवळील टेहरे फाट्यालगत रस्त्यावर दोन्ही बाजूला आडवे अँगल लावावेत. त्यामुळे अवजड वाहनांना प्रतिबंध बसेल.

प्रशासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार श्री. चंद्रात्रे यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या चर्चेत नगराध्यक्ष सुनील मोरे, माजी आमदार संजय चव्हाण, नगरसेवक राहुल पाटील, महेश देवरे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण आदींनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांच्याशी माजी आमदार संजय चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

उपोषणकर्त्यांना दिवसभरातून शहर व तालुक्यातील विविध पक्ष संघटना व जनतेकडून उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.शेषराव पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संस्थापक शंकर सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष संगीता देवरे, मविप्रचे संचालक डॉ. प्रशांत देवरे, समको बँकेचे अध्यक्ष पंकज ततार, पत्रकार चंद्रशेखर शिंपी, बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण, नगरसेवक राहुल पाटील, महेश देवरे, जयवंत पवार, अॅड. नितीन चंद्रात्रे, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे, दि.शं. सोनवणे, दीपक रोंदळ, वैभव गांगुर्डे, बी.डी.पाटील, व्यापारी संघाचे राजेंद्र राका, राजेंद्र येवला, बापू अमृतकार, बेनिराम राणे, महेश भांगडिया, प्रा.किरण दशमुखे, प्रफुल्ल ठाकरे, दामोदर नंदाळे, संजय पाकवार, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संजय देसले, शरद नेरकर, कैलास वाघ, मदनलाल हेडे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. 

Web Title: hunger strike by baglan tehsil marathi journalist union is taken back