vidhan sabha 2019 : प्रचाराच्या रणधुमाळीत पतीराजा उमेदवारांच्या सौभाग्यवतीही !

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आपल्या पतीला विधानसभेत पाठविण्यासाठी सौभाग्यवतींनीही चार भिंतीतून बाहेर पडत प्रचारासाठी कंबर कसली आहे. महिलांचे छोटे मेळावे, बैठका, घरोघरी जाणे, चर्चा, भेटी, पदयात्रा यातून प्रचारात आघाडी घेत आहे. इतकेच नव्हे तर आपला मुलगा, जावई निवडून यावा यासाठी घरच्या मंडळीसह सासरची मंडळीही प्रचारात उतरली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र आहे. 

मनमाड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आपल्या पतीला विधानसभेत पाठविण्यासाठी सौभाग्यवतींनीही चार भिंतीतून बाहेर पडत प्रचारासाठी कंबर कसली आहे. महिलांचे छोटे मेळावे, बैठका, घरोघरी जाणे, चर्चा, भेटी, पदयात्रा यातून प्रचारात आघाडी घेत आहे. इतकेच नव्हे तर आपला मुलगा, जावई निवडून यावा यासाठी घरच्या मंडळीसह सासरची मंडळीही प्रचारात उतरली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र आहे. 

सौभाग्यवतीही चार भिंतीतून बाहेर पडून प्रचारात सहभागी 

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा होऊन आता सर्वांचा प्रचारही सुरू झाला आहे़ मतदानाला कमी दिवस राहिल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी बांधून फिरत आहे़ उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह उमेदवाराचे कुटुंबही मागे नाही विशेषतः उमेदवारांबरोबर आता त्यांच्या सौभाग्यवतीही चार भिंतीतून बाहेर पडून प्रचारात हिरीरीने भाग घेत आहे आपले पतीराज निवडून यावे यास प्रचारात सक्रिय झाल्या आहेत गृहिणी बहुदा घरातच दिसते राजकारण वैगरे गोष्टीत पडतांना त्या दिसत नाही मात्र आपले पतीराज राजकारणात असल्याने आणि उमेदवारी मिळाल्याने त्याही मागे राहायला तयार नाही त्यामुळे उमेदवारांबरोबरच त्यांच्या सौभाग्यवतीही प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत.

पतीराजाला विधानसभेत पाठविण्याचा संकल्प

महिलांच्या छोट्या बैठका, चर्चा, घरोघरी जाणे, पदयात्रा, मतदारसंघातील गावोगावच्या बचतगटांच्या महिलांशी संवाद साधून संबधितांच्या आपल्या पतीराजाला विधानसभेत पाठविण्याचा संकल्प या सौभाग्यवतींनी केला आहे. उमेदवारांच्या सौभाग्यवतींनी शहरातून प्रचारा केल्यानंतर ग्रामीण भागात प्रचार करू लागल्या आहेत. त्यांच्यासमवेत महिला कार्यकर्त्यांचा जथ्था असतो. कार्यकर्त्यां घोषणा देतात, तर सौभाग्यवती हात जोडतात आणि मतदान करण्याचे आवाहन करतात. सौभाग्यवतींचा भर प्रचारफेऱ्या काढून पत्रके घरोघर पोहोच करण्यावर आहे. जाहीरसभांतून मात्र त्या उपस्थित नसतात. सौभाग्यवतीच नव्हे तर आपला मुलगा, आपला जावई निवडून यावा यासाठी उमेदवाराच्या घरच्या मंडळीसह सासरची मंडळीही प्रचारात उतरली आहे आपल्या पतीला, आपल्या मुलाला, आपल्या जावयाला निवडून आणण्याचा चंगच कुटुंबाने बांधला आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband candidates wife going to in the campaign trail!