पत्नीवर चारित्र्याचा संशय..पतीने केले 'असे' कृत्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

चाळीसगावला राहणा-या संजय पवार यांची मुलगी आशाबाई (वय ३०) हिचे पंधरा वर्षांपूर्वी मंगळणे येथील विजय आहिरे (वय ३५) याच्याशी लग्न झाले होते. त्यांना शरद (११) व विशाल (१०) ही दोन मुले असून, विजय हा आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. पत्नी आशाबाईच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. त्यामुळे दोघांचे पटत नव्हते.

नाशिक : मंगळणे (ता. नांदगाव) येथे नवऱ्याने पत्नीच्या मानेवर ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने वार करून तिचा खून केला. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील संजय पवार (रा. डोणडीगर, ता. चाळीसगाव) यांनी नांदगाव पोलिसांत तक्रार दिली. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कोयत्याने केला पत्नीचा खून; पती नांदगाव पोलिसांच्या ताब्यात 

चाळीसगावला राहणा-या संजय पवार यांची मुलगी आशाबाई (वय ३०) हिचे पंधरा वर्षांपूर्वी मंगळणे येथील विजय आहिरे (वय ३५) याच्याशी लग्न झाले होते. त्यांना शरद (११) व विशाल (१०) ही दोन मुले असून, विजय हा आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. पत्नी आशाबाईच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. त्यामुळे दोघांचे पटत नव्हते. दिवाळीसाठी आशा व जावई विजय तिच्या माहेरी गेले होते. ता.३० ऑक्‍टोबरला ते मंगळणे येथे परतले. त्यानंतर आशाने सोमवारी (ता.४) सकाळी बाजूला राहत असलेल्या सासू जिजाबाईला मदतीसाठी जोरजोराने ओरडत असल्याचा आवाज आल्याने ती त्यांच्याकडे गेली. त्या वेळी विजय हातात ऊसतोडीचा कोयता हातात घेऊन उभा होता. जिजाबाईने गंभीर जखमी झालेल्या आशाच्या गळ्यावर कापडी पट्टी बांधून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. हवालदार श्रावण बोगीर व देवराम पाटील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband kills his wife with knife Crime news