पत्नीच्या खून प्रकरणी पतीची कारागृहात रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - व्यंकटेश नगरात पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने डोक्‍यात हातोड्याने वार करीत पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना काल घडली होती. याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे. 

व्यंकटेश नगरात बाबूराव पानपाटील यांच्या भाड्याच्या घरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ज्ञानेश्‍वर पाटील हे पत्नी नीलिमा व अडीच वर्षाची मुलगी कोमल यांच्यासोबत राहत होते. पत्नी नीलिमाचे एका तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री घरी आल्यावर अज्ञात व्यक्ती घरात असल्याचे दिसून आल्याने संतापाच्या भरात त्याने घरात असलेली हातोडी डोक्‍यावर मारून हत्या केली. त्यानंतर पळ काढत तासाभरात रामानंद पोलिसात हजर झाला, ज्ञानेश्‍वरने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या विरोधात रामानंद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आज न्या. सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: husband sent to jail for wife murder case