लग्न समारंभ आटोपून परतीच्या वाटेला निघाले... पण, रस्त्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

लग्न समारंभ आटोपून उमरानामार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असतांना चांदवड श्री रेणूका देवी घाटात हा अपघात घडला. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती, पत्नी व चिमुकलीचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. ट्रेलर चालकाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. 

नाशिक : चांदवड येथील श्री रेणुका देवी घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीला मागच्या बाजूने भरधाव वेगाने मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती, पत्नी व तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. १८) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

अशी घडली घटना

शनिवार (ता. १८) रोजी दुचाकी (क्र एम एच १५, जी एस ०१७६) हिने लखमापूर(सटाणा) येथील लग्न समारंभ आटोपून उमरानामार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असतांना चांदवड श्री रेणूका देवी घाटात हा अपघात घडला. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने जेलरोड येथील रहिवासी (नाशिक) नितीन भिमाजी गांगुर्डे (वय३६) हे पत्नी पूजा(वय३०) व मुलगी अथर्वी (वय३) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. दुचाकीला पाठीमागून देणारा ट्रेलर (क्र. सी जी ०४, जे ए  ४५२७) चालक रतन सिंग फिरोज सिंग (वय ३६) वाहनांसह नाशिकच्या दिशेने पळून जात असतांना मंगरूळ टोल वर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. 

हेही वाचा>मुख्यमंत्र्यांनी केला पोलिसांचा सत्कार.. पण का?

नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा​...

या अपघाताची भीषणता बघता चांदवडकरांनी उपजिल्हा रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच १०८ व सोमा टोल रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचून अपघातातील सर्व मृतदेह चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याचे कळताच व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा बघून सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

घटनेचा पुढील तपास सुरु

याबाबत चांदवड पोलीस स्थानकात पंचनामा करून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस करीत आहे.

हेही वाचा> पोलिस ठाण्यातच ते करायला गेले स्टिंग पुढे काय झाले पहा... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband, wife and daughter killed in a trailer and two-wheeler crash nashik marathi news