कोणत्याही चौकशीस मी तयार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

नाशिक - माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आदिवासी गौरव कार्यक्रमात अनुसूचित जमाती प्रमाणपत्राबद्दल कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे जाहीर करून बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्याही जातप्रमाणपत्र चौकशीचे दिलेले आव्हान सौ. चव्हाण यांनी आज स्वीकारले. आपली कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सौ. चव्हाण म्हणाल्या, की राज्यघटनेच्या दुसऱ्या सूचीत पूर्वाश्रमीच्या मुंबई राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक २१ आणि संयुक्त महाराष्ट्रात आदिवासी ठाकूर जमात ही अनुसूचित जमातीच्या यादी क्रमांक ४४ मध्ये वर्गीकृत आहे. आमच्या आदिवासी ठाकूर जमातीबाबत वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या पुढाऱ्यांनी नेहमी पूर्वग्रहदूषित अन्‌ संकुचित मनोवृत्ती ठेवून जमातीला सवलतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. ठाकूर जमात ही अनुसूचित जमातीत समाविष्ट असल्याबाबत राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यापूर्व काळापासूनची घोषित केलेली अधिकृत यादी आहे. त्याचा दाखला देत सौ. चव्हाण यांनी आदेश क्रमांक, तारीख, नोंद क्रमांक, जमात, निर्धारित क्षेत्राची उदाहरणे प्रसिद्धीपत्रकात दिली आहेत. त्या म्हणाल्या, की श्री. पिचड यांनी दिलेल्या आव्हानानुसार मीही कुठल्याही उच्चस्तरीय अधिकारी, विशेष चौकशी समिती अथवा निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. त्यातून एकदाचा न्यायनिवाडा होऊ द्या.

निकालाअभावी अर्ज करणे मुश्‍कील

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे बी. ए. लोकसेवा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. त्याची परीक्षा ५ जूनला झाली; पण त्याचा निकाल आजून लागलेला नाही. याच कारणास्तव विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक पदासाठी अर्ज करता आलेला नाही. आता ‘आयबीपीएस’च्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट आहे. तत्पूर्वी निकाल न लागल्यास अर्ज करता येणार नसल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. प्रथम वर्षाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. पुन्हा परीक्षा घेण्यात आली, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: I prepared for any inquiries