मांजरपाडयाचे पाणी येवल्यात आणल्याशिवाय रहाणार नाही- छगन भुजबळ

chaggan-bhujbal.
chaggan-bhujbal.

येवला - नाशिक जिल्हा व येवल्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले मांजरपाड्याचे पाणी पुढच्या वर्षी येवला मतदार संघात आणल्याशिवाय रहाणार नाही असे सांगून पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या अस्तारीकरनासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ते विखरणी येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. 

यावेळी त्यांच्या हस्ते विखरणी उपकेंद्रातून सिंगल फेज योजनेची सुरवात करून विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर,अरुण थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधकीसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काले, संजय बनकर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, पंचायत समिती मोहन शेलार, सुनीता मेंगाणे, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संतू पाटील झांबरे, महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनविर, महावितरणचे कार्यकारी अधिकारी डोंगरे, कार्यकारी अभियंता राजेश पाटील, अधिक्षक अभियंता राजेश नरवडे,उपअभियंता शुभांगी कटक आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की,  विकास कामे करतांना स्थानिक लोकांनी पाठपुरावा केला तर चांगले काम होते हे आज येथील विद्युत उपकेंद्रांच्या कामातून दिसते. वीज आणि पाणी हे अतिशय महत्वाची गरज आहे. प्रत्येक घरात वीज पोहचली तरच गावागावात वीज पोहचली असे म्हणता येईल असे त्यांनी यावेळी संगीतले. आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेलीच कामे अद्यापही सुरू आहे सरकारने मांजरपाडा सारखे प्रकल्प रखडवले ते पाठपुराव्यानंतर सुरू झाले आहे. परंतु पाऊस अधिक झाल्याने पुन्हा काम थांबले आहे. मात्र पुढच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

महाराष्ट्राचे गुजरातकडे वाहून जाणारे नार पारचे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या पाण्याचा हक्क गुजरातला लिहून देऊ नका असा इशारा त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्राच्या वाटेचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिले असेही त्यांनी सांगितले. पाच वर्षात झालेले नुकसान टाळण्यासाठी सरकार बदलाची गरज आहे. त्यामुळे जनतेने आता सरकारला पलटी द्यावी असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. शेतकरी पीक विम्यासाठी पैसे भरतात मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र मिळत नाही हा कंपन्यांचा बदमाशपणा असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे लोकशाही मार्गाने दणका देण्याची वेळ आली असल्याचे सांगून चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे असे त्यांनी सांगितले. सरकार कडून नाशिकची कार्यालये पालविण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अंबादास बनकर म्हणाले की, छगन भुजबळ येवला मतदारसंघात असल्याने लोकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. आणि ते पूर्ण देखील करत आहे. पुणे गाव दरसवाडीचे पाणी येवल्यात येण्यासाठी लवकर अस्तारीकरण होण्याची गरज असून ते छगन भुजबळ पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माणिकराव शिंदे म्हणाले की, सद्याचे सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. प्रास्ताविक करतांना मोहन शेलार म्हणाले की, विखरणीचे विकास कामांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी वैभव प्राप्त करून दिले. पुणेगाव दरसवाडी कालव्याल्या फक्त भुजबळ हेच पाणी देऊ शकतात असे सांगून पुढील काळातही आपण मतदार संघाचे नेतृत्व करावे असे आवाहन त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com