आयडीबीआय बॅंकेच्या 'या' संदेशांने उडतेय ग्राहकांची झोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

आयडीबीआय बॅंकेकडून एक संदेश ग्राहकांना पाठविण्यात आलेला आहे. ज्यात म्हटलयं की (ता.१) डिसेंबरपासून आयडीबीआय बॅंकेचे एटीएम वगळता इतर कुठल्याही बॅंकेच्या एटीएममध्ये जाऊन ठराविक रक्कम काढायला गेलात आणि जर खात्यात (insufficient balance) अपूर्ण रक्कम असेल तर ट्रान्झक्शन रद्द करण्यात आली, तर तुम्हाला २० रुपयांचा शुल्क आकारला जाईल. असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे

नाशिक : आयडीबीआय बॅंक १ डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी बदल करीत आहे, असा संदेश बॅंकेने आपल्या ग्राहकांना पाठविला आहे. आयडीबीआय बॅंकेचे एटीएम वगळता इतर काेणत्याही बॅंकेच्या एटीएममधून रक्कम काढली आणि खात्यावर पुरेशी (insufficient balance) रक्कम नसेल तर व्यवहार रद्द करण्यात येईल, तसेच ग्राहकाला २० रुपयांचे शुल्क आकारले जाईल, असेही या संदेशात म्हटले आहे. बॅंकांकडून वेळोवेळी आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा विषय निघाला की ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. सध्या आयडीबीआय बॅंकेच्या या शुल्कावरुन परत एकदा गरमागरम चर्चा ग्राहकांमध्ये सुरू झाल्या आहेत.

Image may contain: text

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IDBI Bank's Messages about ATM charge Nashik News