PHOTOS : नैसर्गिक नजाकतीमुळे "नाशिकचे काश्‍मीर' म्हणून 'या' गावाला ओळख

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

गुजरातच्या सरहद्दीवरील गावात हरसूल आणि पेठमार्गे रस्ते आहेत. घाट-नद्या पार करत गावात पोचता येते. तीन हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या गावातील शाळा डिजिटल स्कूल म्हणून पुढे आले आहे. नैसर्गिक नजाकतीमुळे "नाशिकचे काश्‍मीर' म्हणून या भागाला ओळख मिळाली असून, इथले आदिवासी नृत्य जिल्ह्यात प्रसिद्ध आहे

नाशिक : फणसपाडा (खरपडी) हे पेठ तालुक्‍यातील राज्यातील सीमाभागातील गाव. गुजरातच्या सरहद्दीवरील गावात हरसूल आणि पेठमार्गे रस्ते आहेत. घाट-नद्या पार करत गावात पोचता येते. तीन हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या गावातील शाळा डिजिटल स्कूल म्हणून पुढे आले आहे. नैसर्गिक नजाकतीमुळे "नाशिकचे काश्‍मीर' म्हणून या भागाला ओळख मिळाली असून, इथले आदिवासी नृत्य जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. 

पेठमधील पहिल्या डिजिटल स्कूलचे गाव 

गावात मारुती, विठ्ठल-रुखमाई, देवराम महाराजांचे मंदिर आहे. गावात एक प्राथमिक शाळा आणि एक पहिली ते दहावीपर्यंतची आश्रमशाळा आहे. डिजिटल स्कूलमधील चौथीपर्यंतचे विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेतात. या शिक्षणाचा लाभ आता परिसरातील चार गावांतील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. डिजिटल स्कूलचे उद्‌घाटन विद्यार्थिनी गौरी भोये हिच्या हस्ते झाले. शाळेच्या भिंती "कार्टून', नकाशे अन्‌ विविध माहितीने सजल्या आहेत. जमिनीवर खेळातून शिक्षण दिले जाते. संगणकाचे ज्ञान आदिवासी विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून एलसीडी स्कीन, संगणक, डिजिटल अभ्यासक्रम, प्रिंटर अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नाशिक नेचर क्‍लबतर्फे त्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे. गावात मात्र वाचनालय, व्यायामशाळा नाही. गावाच्या तीनही बाजूने रास, दमणगंगा आणि मढे ही नदी वाहते. पावसाळ्यात हा रम्य परिसर काश्‍मीरगत भासतो. 

Image may contain: one or more people, people standing and outdoor 

आदिवासी नृत्यही प्रसिद्ध 

सहा वर्षांपासून येथे हरिपाठ होते. भजनी मंडळात रामदास काकड, पांडुरंग टिकले, एकनाथ काकड, निवृत्ती ठाकरे, काशीनाथ चिखले, अंबादास खडम, यशवंत चिखले आदींचा सहभाग असतो. येथील पावरी वादक जयराम काकड तालुक्‍यात ओळखले जातात. आदिवासी परंपरा जोपसण्याचे काम येथील तरुणाई करत आहे. पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळत असला, तरीही उन्हाळ्यात गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आश्रमशाळेतील पंचवीस विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य दाखवत आहेत. तीस वर्षांपासून "एक करंजी-दोन लाडू, अनाथ-दिव्यांगांशी नाते जोडू', हा उपक्रम नाशिकच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेच्या पुढाकारातून राबवला जात आहे. त्यात परिसरातील पाच पाडे सहभागी होतात. 
 
Image may contain: outdoor

श्‍वान तारफ्याच्या सुरावर लावतो सूर 
गावाजवळील डोंगराच्या पायथ्याशी छोट्या झोपडीत जयराम गुरव यांचे कुटुंब राहते. जयराम लहानपणापासूनच तारफा वाजवतात. त्यांच्या पत्नी जन्याबाईही तारफा वाजवतात. झोपडीजवळ अनोळखी माणूस दिसला, की मोती श्‍वान जोरात भुंकतो. जयराम बाबांनी तारफा वाजवण्यास सुरवात करताच, मोती त्या सुरात सूर मिसळतो. जयराम बाबांनी हे वाद्य स्वतःच डांगराचा वापर करून बनवले आहे. त्यांच्या घरात चार तारफा लटकलेले असतात. यंदाच्या अतिवृष्टीत भाताचे पीक वाया गेले. पण जयरामबाबा खचले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेतली. 

हेही वाचा > लग्नाच्या वाढदिवस होता 'त्याचा' त्यादिवशी..अन् अचानक हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश 

नक्की बघा > PHOTO : अरे बापरे! म्हशीच्या पोटातून 'हे' काय निघाले?

विकासकामांपासून कोसो मैल दूर आहे आमचे गाव.

गावात येण्यासाठी रस्ता नाही. आम्ही आदिवासी कलांची जोपासना केली आहे. पावसाळ्यात आमच्या गावात अनेक पर्यटक येतात. - रामदास भोये, ग्रामस्थ 

महाविद्यालयात मी शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. आमच्या भागात अनेक खेळाडू आहेत. पण त्यांना संधी आणि मार्गदर्शन मिळत नाही. मी कबड्डी खेळतो. गावात खेळाचे साहित्य नसल्याने शेतात सराव करतो. - धनराज चिखले, विद्यार्थी 

हेही वाचा > PHOTOS : नदीत गाडी पडल्यानंतर दोन्ही अभियंते सीटबेल्ट काढण्यासाठी धडपडत होते... पण शेवटी ....

हेही वाचा > अपघातांच्या खटल्यात चक्क दीड कोटीची भरपाई?​

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identification of fanaspada village as "Kashmir" of Nashik marathi news