
Nandurbar News : बायपास रस्ता दुरुस्त न केल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार!
नंदुरबार : शहरातील नॅशनल हायवेच्या (National Highway) अखत्यारित असलेला बायपास रस्ता खराब असल्यामुळे लवकर दुरुस्त करण्यात यावा. (If bypass road is not repaired case of culpable homicide will be filed Warning By dr Vikrant More nandurbar news)
अन्यथा आठ दिवसांच्या आत बायपास रस्ता दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा डॉ. विक्रांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या प्रसंगी, अॅड. चारुदत्त कळवणकर, सुभाष पानपाटील, नरेंद्र माळी उपस्थित होते. तसेच या रस्त्यावर (स्व) वामन सोना महाजन, नरोत्तम बाबू परमारकर, सुदाम लक्ष्मण जाधव यांचे अपघाती निधन झाले असून मणिलाल चौधरी हे अपघातात जखमी झाले होते. त्यांचे नातेवाईक देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
डॉ. विक्रांत मोरे म्हणाले, अनेक वर्षांपासून सदर रस्ता हा नादुरुस्त अवस्थेत आहे, अनेक अपघात या खराब रस्त्यांमुळे येथे घडलेले आहेत. काही लोक जिवानिशी गेले तरीही नॅशनल हायवेकडून साधी डागडुजी सुद्धा झालेली नाही.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
म्हणून कुंभकर्णाच्या निद्रेत झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी तसेच, नंदुरबारच्या जनतेच्या सुरक्षितता राखण्यासाठी आठ दिवसांच्या आत बायपास रोड दुरुस्ती नाही केला तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे.
नितीन गडकरी देशात चांगले काम करता आहे पण महाराष्ट्रात काही निर्लज्ज अधिकाऱ्यांमुळे त्यांचे नाव खराब होत आहे. देशात रस्त्यांचे जाळे उभे राहत असताना नंदुरबारकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नंदुरबारच्या बायपास रस्त्याची दुरवस्था गांभीर्याने घेऊन अधिकाऱ्यांना सूचना कराव्या असे त्यांनी नमूद केले.