पोलिस तंदुरुस्त असले तरचं समाजातील शांतता व सुव्यवस्था टिकण्यास मदत होणार

tandrust-bandobast.jpg
tandrust-bandobast.jpg

मंगळवेढा : जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलिसच तंदुरुस्त असले तरचं समाजातील शांतता व सुव्यवस्था टिकण्यास मदत होणार असून पोलिसांच्या आरोग्याबाबत वारी परिवाराचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पो. नि.प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केले. 
स्वतःच्या घरातील सण साजरा न करता सध्याच्या गणेश उत्सव व मोहरम सणासाठी शहरातील दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक येथे बंदोबस्तासाठी सज्ज असून सुध्दा त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांच्या आरोग्यासाठी 'सकाळ' राज्यभर राबवित असलेला 'तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम पोलिस ठाण्यात वारी परिवाराच्यावतीने राबविण्यात आला. यावेळी स. पो. नि. वैभव मारकड, पो. उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, डॉ विवेक निकम, पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, बशीर बागवान, अफरोज शेख, सतिश दत्तू, अजित शिंदे, प्रा सचिन इंगळे, माणिक गुंगे, महेश दत्तू, संभाजी नागणे, नंदकुमार साळूंखे, पांडुरंग कौंडुभैरी, रतिलाल दत्तू, इंद्रजित घुले, सुनिल मस्के, सिद्धार्थ साखरे, आकाश सुरवसे, स्वप्निल टेकाळे, सुदर्शन ढगे, रामेश्वर पवार, रमेश दत्तू, स्वप्निल फुगारे, वैभव मुढे, विजयसिंह दत्तू, शकिल मुजावर, अरूण गुंगे, आदीसह पोलिस खात्याचे कर्मचारी व वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना पो.नि.प्रभाकर मोरे म्हणाले की पोलिस विभागाच्या रस्ता वाहतुक सुरक्षा, पालखी बंदोबस्त, व्यसनमुक्ती, अशा अनेक कामात वारी परिवाराचे खूप मोठे सहकार्य राहिले असून वारी परिवाराच्या कोणत्याही चांगल्या सामाजिक कार्यात पाठीशी राहिलो असून समाजीक उपक्रम वारी परिवाराने यापुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. 

डॉ विवेक निकम म्हणाले उत्सव काळात बंदोबस्तामुळे पोलिसांच्या वरती प्रचंड ताणतणाव येतो. त्यासाठी आरोग्याची काळजी घेवून उत्तम आरोग्यासाठी नियमित सकस आहार महत्वाचा असुन तेलकट पदार्थ टाळून फळे, ड्रायफूट खाणे गरजेचे आहे. आहार, आचार, विहार, विचाराचे महत्वही सांगत समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवाचे रक्षण आपण करावे कारण पोलिस आपले मित्र आहेत या हेतूनेच असे उपक्रम होणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी नगरसेवक बशीरभाई बागवान, अफरोज शेख, नागेश पिसे यांचे विशेष सहकार्य लाभले याप्रसंगी पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांचेसह कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा विनायक कलुबर्मे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com