इगतपुरीपेक्षा त्र्यंबकेश्‍वरला मतदारांचा अभूतपूर्व उत्साह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

इगतपुरीत ६८.५३, तर त्र्यंबकेश्‍वरला ८४.७४ टक्के मतदान
इगतपुरी/ त्र्यंबकेश्‍वर - इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज शांततेत मतदान झाले.  इगतपुरीपेक्षा आज त्र्यंबकेश्‍वरला मतदारांनी जास्त उत्साह दाखविला. इगतपुरीत ६८.५३ टक्के, तर त्र्यंबकेश्‍वरला ८४.७४ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी उद्या (ता. ११) मतमोजणी होईल.

इगतपुरीत यंदा शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार रिंगणात असले, तरी येथे दुरंगी लढतच झाल्याचे चित्र आहे. त्याच वेळी त्र्यंबकेश्‍वर नगर परिषदेत मात्र शिवसेना, भाजप, काँग्रेससह अपक्षांनीही जोर लावल्याने मोठ्या प्रमाणावर चुरस बघावयास मिळाली. दोन्ही ठिकाणी नगर परिषद सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. दोन्ही नगर परिषदांत जोरदार चुरस असल्याने अंदाज वर्तवणे कठीण असले, तरी सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्षांनीदेखील आपल्या विजयाचा दावा केला आहे. उद्या सकाळी दहापासून मतमोजणीला सुरवात होईल. दुपारनंतर निकाल हाती येण्याची शक्‍यता असून, त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, अशी स्थिती आहे.

Web Title: igatpuri nashik news nagar parishad election