नववी उत्तीर्ण शिक्षकांना प्रशिक्षणाची अखेरची संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

इगतपुरी - राज्याच्या प्राथमिक शाळांमध्ये एकीकडे चक्क पोस्ट डॉक्‍टरेट झालेले शिक्षक अध्यापन करत असताना, एक हजार 868 शिक्षक दहावीच्या आत शिक्षण घेतलेले आहेत, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य. राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर एकही शिक्षक अप्रशिक्षित असणार नाही, असे अपेक्षित होते. मात्र, अद्याप राज्यात दोन हजार शिक्षक दहावीच्या आत शिकलेले आहेत. राज्य सरकारने त्यांना आरंभी 2015 आणि आता केंद्र सरकारने 2019 अखेर प्रशिक्षित होण्याची संधी दिली. मात्र, या संधीचा लाभ उठवला नाही तर नोकरी गमावण्याचा धोका आहे. 

#शिक्षकभरती

राज्यात सहा लाख 66 हजार 338 प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांपैकी 82 हजार 427 शिक्षकांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झालेले आहे. एक लाख 56 हजार 346 शिक्षकांचे शिक्षण उच्च माध्यमिकपर्यंत झालेले आहे. तीन लाख 3 हजार 665 शिक्षक पदवीधर असून, एक लाख 19 हजार 897 शिक्षक पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले आहेत. एक हजार 971 शिक्षक एम.फिल., पीएच.डी. आहेत. 170 शिक्षक हे पोस्ट डॉक्‍टरेट आहेत. विशेष म्हणजे, हे शिक्षक इयत्ता एक ते पाचच्या वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. राज्यात शिक्षकांची गुणवत्ता लक्षात घेता, प्राथमिक शिक्षणात साधारण 60 टक्के शिक्षक हे अपेक्षेपेक्षा अधिक पात्रताधारक आहेत. राज्यात दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षक असले तरी चालणार आहेत, अशा परिस्थितीत 60 टक्के शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने उच्च पदवी धारण केली आहे, हे विशेष आहे. इयत्ता सातवी ते नववीपर्यंत शिकलेल्या शिक्षकांना राज्य सरकारने या वर्षी प्रशिक्षणाची अखेरची संधी दिली असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ केली जाणार नाही. 

Web Title: igatpuri news last chance of training for the ninth passed teacher