यंदापासून बीएडसाठी तीन प्रवेश परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

इगतपुरी - शिक्षण महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदापासून तीन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. चार आणि तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमांसाठी जूनमध्ये या दोन्ही प्रवेश परीक्षा होणार आहेत. याशिवाय दरवर्षीप्रमाणे दोन वर्षांच्या बीएडसाठीदेखील वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यातील बहुतांश महाविद्यालयांत सध्या दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी राज्य स्तरावर सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा 9 आणि 10 जूनला होणार आहे. याच दोन दिवसांत इंग्रजी माध्यमांच्या महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठीही परीक्षा घेतली जाईल. याच्या जोडीने यंदापासून दोन वेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यापैकी पहिली परीक्षा चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी, तर दुसरी परीक्षा तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी होणार आहे. 21 जूनला या दोन्ही प्रवेश परीक्षा होणार आहेत.

महाराष्ट्रात निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये चार आणि तीन वर्षांचे अभ्यासक्रम राबविले जातात. चार वर्षांचा अभ्यासक्रम बारावीनंतर करावयाचा असून, त्यामध्ये बीए, बीकॉम किंवा बीएस्सीसह बीएडची पदवी दिली जाईल. दरम्यान, तीन वर्षांचा अभ्यासक्रम पदवीनंतर करावयाचा असून, यामध्ये बीएड आणि एमएड हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्र करण्यात आले आहेत. असेच अभ्यासक्रम येत्या काळात राज्यात सर्वत्र लागू केले जाणार असल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून राज्याच्या सीईटी सेलतर्फे या अभ्यासक्रमांसाठी यंदापासून वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: igatpuri news nashik news bed education entrance exam