नंदुरबार : न्याहाली गावाजवळ सव्वा कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त

police seized liquor stock
police seized liquor stockesakal

नंदुरबार : अवैधरीत्या अन्‍य राज्यातील मद्याची वाहतूक (Illegal Transport of liquor) करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) कारवाई करून आज न्याहाली (ता.नंदुरबार) गावाजवळ एक कोटी १४ लाख ६८ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. (Illegal liquor stocks worth of 1 crore 15 lakh rupees seized by State Excise Department Nandurbar Crime News)

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून परराज्यातील अवैधमद्य वाहतुकीवर स्थानिक पोलिसांकडून कारवाई सुरू होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडमध्ये आल्याने आजच्या कारवाईवरून दिसून आले. गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने नंदुरबार न्याहली शिवारात दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH- ४६- F ४८६८) वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण एक लाख ३६८० बाटल्या (२१६० बॉक्स) मिळून आले.

police seized liquor stock
जळगाव : रावेर येथे पालिकेच्या नालेसफाईचा बोजवारा

या कारवाईत वाहनासह संशयित आरोपी रोहित जालिंदर खंदारे (रा. पोखरापूर खंदारे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापुर), अविनाश मोहन दळवे (रा.पोखरापूर, ता. मोहोळ जि. सोलापुर) यांना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकूण एक कोटी १४ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक डी. एम. चकोर , दुय्यम निरीक्षक पी. जे. मेहता, एस.एस. रावते , पी. एस. पाटील सोबत जवान अविनाश पाटील, भूषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे आदींनी केली.

police seized liquor stock
Jalgaon : स्कूल चले हम..पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, पुस्तके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com