पोलिसांनी दारू विक्रेत्यांनवर उगारला कारवाईचा बडगा 

दीपक कच्छवा 
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 55 गावे आहेत.यापैकी बहुतांश गावामध्ये गावठी दारूसह देशी विदेशी बनावट दारूची बिनधास्त विक्री होत आहे.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर काहीचे उध्वस्त होत आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : येथील पोलिस ठाण्यात नव्याने बदलून आलेले साहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी अनाधिकृतरित्या गावठी दारू विक्रेत्यांनवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज सकाळी सातला वडगाव लांबे व भवाळी (ता.चाळीसगाव) याठिकाणी हातभट्टीच्या आड्यावर छापा टाकून सुमारे 35 हजार पाचशे रुपयांचे रसायन जप्त करुन जागेवर नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईचे महीलांमधुन स्वागत केले जात आहे. 
  
मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 55 गावे आहेत.यापैकी बहुतांश गावामध्ये गावठी दारूसह देशी विदेशी बनावट दारूची बिनधास्त विक्री होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर काहीचे उध्वस्त होत आहे. यामुळे अनेक गावांमधील महींलानी दारुबंदीचा मागणी केली आहे.येथील पोलिस ठाण्याचे नव्याने आलेले साहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी अवैध धंदेवाल्यावंर कारवाईंचा बडगा उगारला आहे. वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील खाऱ्या नाल्याजवळ गावठी हातभट्टीवर दारु तयार होत असल्याची गोपनीय माहिती बेंद्रे यांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून त्यांनी छापा टाकला तर दुसरी कारवाई भवाळी येथे करुन त्यात 19000 हजार रु की चे रसायन व दारू जप्त करुन कारवाई करण्यात आली. बेंद्रे यांनी केलेल्या या कारवायांचे महिलांनी स्वागत केले आहे. अश्या कारवाया सुरूच ह्या सुरुच राहणार आहे अशी माहिती श्री बेंद्रे यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal liqur racket busted chalisgaon police