मालेगावला आयएमएचा लाक्षणिक संप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

मालेगाव ः कोलकता येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्‍टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्‍टर सुरक्षा विधेयक तत्काळ संमत करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी देशभर इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 24 तासांच्या लाक्षणिक संपात येथील आयएमएसह इतर वैद्यकीय संघटना सहभागी झाल्या. सोमवारी (ता. 17) येथे एक दिवसाचा कडकडीत संप  पाळण्यात आला.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. मयूर शहा, सचिव डॉ. प्रशांत वाघ यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन दिले. शहरातील आयएमए संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, डॉक्‍टर्स व इतर वैद्यकीय संघटनांनी एकत्रित मोसम पुलावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ काही काळ मूक धरणे आंदोलन केले. शहरातील सर्व क्‍लिनिक्‍स, हॉस्पिटल व वैद्यकीय सेवा पूर्णतः बंद होत्या. अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी द्वारकामणी हॉस्पिटल व फरान हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी कक्ष आयएमएतर्फे सुरू करण्यात आला होता.
मूक धरणे आंदोलनात डॉ. यशवंत पाटील, डॉ. मिलिंद परिपत्यदार, डॉ. सुरेश शास्त्री, डॉ. सचिन ठाकरे, डॉ. विनीत देवरे आदी सहभागी झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMA Expanse in Malegaon.