भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी - दीपिका चव्हाण

dipika-chavhan
dipika-chavhan

सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडावा अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत आमदार सौ. चव्हाण यांनी श्री. बागडे यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, छगन भूजबळ हे देशभरातील बहुजन, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक व इतर मागासवर्गीय समाजाचे नेते आहेत. या समाजांच्या उन्नतीसाठी साहेबांनी मोठे योगदान दिले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नेते आहेत. देशात व राज्यात त्यांच्या सभांसाठी व स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमत असतो.

छगन भुजबळ हे महाराष्ट्र विधानमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत. समाजविघातक प्रवृत्तीकडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाच्या गृहविभागामार्फत त्यांच्या संरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी. याबाबत आपल्या माध्यमातून आदेश व्हावेत आणी पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडण्याची आग्रही मागणीही आमदार सौ. चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com