अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह शरदचंद्र मार्केटयार्ड परिसरातील पाण्याच्या टाकीत टाकून दिला होता. याप्रकरणी दोघांना जिल्हा व सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांनी जन्मठेप व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तर तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरचा प्रकार 21 ऑक्‍टोबर 2017 रोजी रात्री घडला होता. 

गणेश वसंत गरड (22, रा. नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), सुनील रामदास अहिरे (29, रा. फुलेनगर, पंचवटी) असे आरोपींची नावे आहेत. मयत दशरथ बाळू ठमके (रा. गजानन चौक, पेठरोड) याच्या पत्नीशी आरोपी गणेश गरड याचे अनैतिक संबंध होते. ही बाब दशरथ ठमके यांना समजली असता, त्यांनी आरोपी गरडला, माझ्या पत्नीचा नाद सोडून दे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश गरड याने 21 ऑक्‍टोबर 2017 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दशरथ ठमके यास दारू पाजण्याच्या बहाण्याने पेठरोडवरील शरदचंद्र मार्केटयार्ड परिसरात नेले. त्याठिकाणी त्याने साथीदार सुनील रामदास अहिरे, राहुल उर्फ भुजया भिमा लिलके (19, रा. एरंडवाडी, म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (24, रा. कालिकानगर, पंचवटी), सुशील उर्फ श्‍याम मधुकर बागूल (31, रा. गजानन चौक, दिंडोरी रोड) यांनाही बोलाविले होते. यावेळी ठमके यांना दारु पाजल्यानंतर आरोपी गरड व साथीदारांनी चॉपरने वार करीत निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मयत ठमकेच्या पायाला दोरी बांधून यार्डातील मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. दरम्यान, दोन दिवसांपासून भाऊ बेपत्ता असल्याने भाऊ संतोष ठमके याने पंचवटी पोलीसात तक्रार दिली होती. चौकशीत ठमके हे आरोपी गरडसोबत गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर ठमके यांचा खून केल्याचे उघड झाले.

तसेच, तीन दिवसांनतर त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढण्यात आला होता. सदरचा तपास तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी केला होता. 

याप्रकरणी न्यायधीश एन.जी. गिमेकर यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यातून सबळ व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी गरड व आहिरे यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तर अन्य तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलीस नाईक एस. एल. जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी काम पाहिले.

Web Title: Immoral relations Murder Both of them gave Prison

टॅग्स