नात्यागोत्याच्या राजकारणाला येणार महत्त्व 

नात्यागोत्याच्या राजकारणाला येणार महत्त्व 

नाशिक - ग्रामीण भागाचा बहुतांशी समावेश असलेल्या प्रभाग 31 मध्ये नात्यागोत्याला महत्त्व येणार आहे. कॉलनी, नगरांचा भाग सोडला, तर बहुतांशी भाग ग्रामीण आहे. त्यातही एकमेकांच्या सुख-दुखाच्या कार्यात सहभागी होणारे नातेवाईक निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात खरी लढत शिवसेनेची भाजपबरोबर होणार आहे. 

शिवसेनेचे प्रभाकर पाळदे, विजय डेमसे, सुशीला बिरारी, तसेच कॉंग्रेसचे के. के. नवले, स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव, अपक्ष संजय नवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर बोराडे, मनसेचे सुदाम कोंबडे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. सद्यःस्थितीत सुदाम डेमसे, सुदाम कोंबडे, अमोल जाधव, देवानंद बिरारी, संजय नवले, माणिक मेमाणे, राम बडगुजर, भगवान दोंदे, गणेश ठाकूर, वसंत पाटील, सुनील कोथमिरे, मनोहर बोराडे, जयश्री जाधव, संगीता जाधव, पूजा नवले, सोनाली नवले, रोहिणी केदार, वंदना बिरारी, शारदा दोंदे, पुष्पा आव्हाड, कल्पना मेमाणे, डॉ. पुष्पा पाटील या इच्छुकांची नावे आघाडीवर आहेत. 

व्यक्तिकेंद्रित राजकारण 

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून शिवसेनेला या प्रभागातून साथ मिळाली आहे; परंतु भाजपनेसुद्धा जम बसविल्याने शिवसेनेला आव्हान निर्माण होऊ शकते. या भागात नात्यागोत्याचे राजकारण नेहमी महत्त्वाचे ठरते. दाढेगाव, पाथर्डी येथील एकगठ्ठा मतदान कोणाकडे झुकते, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहते, पण यंदा प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने राजकीय गणिते बदलू शकतात. या भागातील आतापर्यंतच्या निवडणुकांत नवीन नगरसेवक निवडून देण्याची परंपरा आहे. यंदा विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली जाते की नवीन नेतृत्व उदयाला येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

प्रभागाच्या समस्या 

- नववसाहतींमध्ये पाणीटंचाई 

- कॉलनींतर्गत रस्त्यांची दुरवस्था 

- अनियमित घंटागाडी 

- अस्वच्छता 

- मळे भागातील बंद पथदीप 

प्रभाग 31 

लोकसंख्या - 44,960 

अनुसूचित जाती - 6,136 

अनुसूचित जमाती - 3, 473 

31 (अ) - अनुसूचित जाती 

31 (ब) - इतर मागासवर्ग महिला 

31 (क) - सर्वसाधारण महिला 

31 (ड) - सर्वसाधारण 

प्रभागाची व्याप्ती ः गणेश कॉलनी, नगरकर लेन, इच्छापुरी चौक, राणेनगर, सीमेन्स कॉलनी, साई पॅलेस हॉटेलच्या पूर्वेकडील भाग, अनमोल नयनतारा गोल्ड, हॉटेल सेव्हन हेवन पूर्वेकडील भाग, ज्ञानेश्‍वरनगर, समर्थनगर, वडाळा-पाथर्डी रोड, गुरू गोविंदसिंग स्कूल महाविद्यालयासमोरील भाग, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाण, पाथर्डी रोडच्या उत्तर व दक्षिणेकडील भाग, प्रशांतनगर, अयोध्या कॉलनी, नरसिंहनगर, दामोदरनगर, फाळके स्मारक व लगतचा भाग, पाथर्डी गाव, पाथर्डी-दाढेगाव रोडचा पूर्व व पश्‍चिम भाग, दाढेगाव, पिंपळगाव खांब रोडचा पश्‍चिमेकडील भाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com