
Dhule News : बोदगाव येथे गाय फस्त; बिबट्या जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
साक्री (जि. धुळे) : तालुक्यातील बोदगाव-चिंचपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली. मृत गायीचा वन विभागाने पंचनामा केला असून, वन विभागाने बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (in bodgaon leopard killed cow Farmers demand to imprison leopards dhule news)
या वेळी वन विभागाचे कर्मचारी रोशन काकुस्ते यांनी हा पंचनामा केला असून, या वेळी बोदगाव येथील सरपंच काशीनाथ पवार, आदिवासी बचाव समितीचे अध्यक्ष गणेश गावित, लक्ष्मण सूर्यवंशी, नाना भोई, श्रीराम गायकवाड, ज्योतिराम भोई, योगेश भारुड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यास माहिती देताना सांगितले, की परिसरात दोन बिबट्यांचा वावर असून, एका मादीची दोन पिल्ले आहेत. यामुळे वारंवार जनावरे फस्त करण्याचा घटना घडतात. पाळीव पशुधन यामुळे नष्ट होत असून, त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
बोरगाव, चिंचपाडा, आमोडे, मैंदाणे, कालदर, ढवळीविहीर, भोणगाव ही गावे आणि शेती क्षेत्रात शेतकरी धास्तावले आहेत. बोधगाव येथील देवीदास गजमल भारुड यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नुकतीच घडली. या मृत गायीचा पंचनामा वन विभागाने केला असून, तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.