Nandurbar News : मोगराणीत शॉर्टसर्किटने गॅस सिलिंडरचा स्फोट; घरे खाक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former President of Zilla Parishad Rajni Naik visiting the family burnt in the fire and offering help

Nandurbar News : मोगराणीत शॉर्टसर्किटने गॅस सिलिंडरचा स्फोट; घरे खाक!

नवापूर (जि. नंदुरबार) : मोगराणी (ता. नवापूर) येथील दोन घरांना २७ फेब्रुवारीला दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने गॅस सिलिंडरचा (Cylinder) स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन्ही घरे जळून खाक झाली. त्यामुळे तीन कुटुंबे बेघर झाली. (In Mograni gas cylinder exploded due to short circuit and destroyed house nandurbar news)

तलाठी विकी गागुर्डे यांनी पंचनामा केला. दोन्ही घरांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. तिन्ही कुटुंबांचे सांत्वन करून मदत केली.

मोगराणी येथील विकास सुपडिया पाडवी, लालसिंग अर्जुन वळवी, रोहिदास लक्ष्मन वळवी यांच्या मालकीच्या दोन घरांना २७ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घरांना आग लागली.

आगीत दोन घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. धान्यासह घरगुती सामानासह धान्य व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. गॅसचा स्फोट इतका भयंकर होता की अख्खे गाव हादरले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

या दुर्घटनेची माहिती होताच मंगळवारी (ता. २८) पाहणी करण्यासाठी व संबंधित कुटुंबांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत दोन घरे जळून गेली आहेत, त्या कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. धान्य व पैशाची आर्थिक मदत केली.

या वेळी पंचायत समिती सदस्य राजू कोकणी, मोगराणीच्या सरपंच सुशीला कोकणी, माजी सरपंच पोसल्या कोकणी, ग्रामपंचायत सदस्य धनिल कोकणी, लक्ष्मण कोकणी, सामी गावित, ढोगचे सरपंच देवा कोकणी, ग्रामपंचायत सदस्य सलिमा गावित, माजी सरपंच देशुबाई कोकणी, कविदास कोकणी आदी उपस्थित होते. आमदार निधीतून व शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वसन दिले. या वेळी मोगराणी ग्रामस्थ मोठया संख्यने उपस्थित होते.